Video : चेंडूच तो! 147 किमी वेगाने आलेला, थेट मैदानाबाहेर भिरकावला

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

चौथ्या षटकातील पाचवा चेंडू बिलीने गुड लेंथमध्ये टाकला. हा चेंडू ताशी 147 किमी वेगवाने टाकले होता. या चेंडूला दनुष्काने फक्त बॅटने स्पर्श करून दिशा दिली. दनुष्काच्या या शॉटमुळे चेंडू थेट सीमापार गेला आणि षटकार झाला. चेंडू मैदानातच होता मात्र, तो हरवल्याने पंचांना नवीन चेंडू मागवावा लागला. 

ब्रिसबेन : सध्या ट्वेंटी20 प्रकारामुळे क्रिकेट खूप फास्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकारात भन्नाट शॉटही पाहायला मिळतात. अशाच एका भन्नाट शॉटचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. 

BCCIची एक चूक आणि भुवनेश्वरचे आख्खं करिेअर धोक्यात!

श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ब्रिसबेन येथे झालेल्या ट्वेंटी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बिली स्टॅनलेकच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुनातिलकाने एक भन्नाट शॉट मारला. हा शॉट मारल्यावर चेंडू गायब झाला आणि पंचांना नवा चेंडू मागवावा लागला. 

चौथ्या षटकातील पाचवा चेंडू बिलीने गुड लेंथमध्ये टाकला. हा चेंडू ताशी 147 किमी वेगवाने टाकले होता. या चेंडूला दनुष्काने फक्त बॅटने स्पर्श करून दिशा दिली. दनुष्काच्या या शॉटमुळे चेंडू थेट सीमापार गेला आणि षटकार झाला. चेंडू मैदानातच होता मात्र, तो हरवल्याने पंचांना नवीन चेंडू मागवावा लागला. 

दरम्यान डेव्हिड वॉर्नर-स्टीव स्मिथ यांच्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेला नऊ विकेट राखून हरविले. याबरोबरच कांगारूंनी तीन लढतींच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

चेंडू दवाने ओला होऊ नये म्हणून डे-नाईट टेस्टसाठी गवत कुठे, किती हवे?

118 धावांच्या माफक आव्हानासमोर कांगारू कर्णधार ऍरॉन फिंच याला तिसऱ्याच चेंडूवर प्रतिस्पर्धी कर्णधार लसित मलिंगाने बाद केले. त्यानंतर वॉर्नर-स्मिथ यांनी 13 षटकांतच लक्ष्य गाठले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch Danushka Gunathilaka Hits Billy Stanlake for a Huge Six against Australia