थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय, धोनीची नेटप्रॅक्टीस सुरु 

Watch MS Dhoni Hits Nets For The First Time After World Cup
Watch MS Dhoni Hits Nets For The First Time After World Cup

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह सध्या काय कसतो, तो कुठे आहे, तो परत क्रिकेट खेळणार की तो आता निवृत्ती घेणार? थांबा थांबा अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. कारण धोनी रांचीच्या स्टेडियममध्ये सराव करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

धोनी सध्या रांचीच्या झारखंड स्टेट असोसिएशन स्टेडियममध्ये सराव करत आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी तो तयारी करत असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी धोनीने स्वत:च्या तंदुरुस्तीवर काम करण्यास सुरवात केली, आता त्याने सरावासही सुरवात केली आहे. त्यामुळे तो निवृत्त होणार अशा चर्चांना तात्काळ तरी पूर्णविराम मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com