esakal | रैनाच्या लव्हली व्हिडिओवर ज्वालाही झाली फिदा!
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer,suresh raina, Viral Video, Badminton Star jwala gutta

सुरेश रैनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हिला देखील हा व्हिडिओ चांगलाच भावला आहे.

रैनाच्या लव्हली व्हिडिओवर ज्वालाही झाली फिदा!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलगा  रियो (Rio) सोबत खेळताना दिसत आहे. कार कोणीतरी अन्य व्यक्ती चालवत असून रैना बॅक सीटवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. कारमध्ये सलमान खान (Salman Khan) च्या  ‘बजरंगी भाई जान’ (Bajrangi Bhaijaan) गाणे सुरु आहे. रैना गाण्यात सूर मिसळत आपल्या मुलाला गाण ऐकवत खेळवताना दिसतो.  

‘कुछ तो बता जिंदगी…अपना पता जिंदगी…’ या कॅप्शनसह रैनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अबोल लहान मुलांना पकडून जेव्हा आपण त्यांच्या गप्पा मारतो तेव्हा ती मुलं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, असा उल्लेखही त्याने ट्विटमध्ये केलाय. रैनाने हा व्हिडिओ शेअर करताच प्रतिक्रियांची बरसात होताना दिसते आहे. भारताची अनुभवी बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) ने so sweet असे लिहून दोन हार्टवाल्या इमोजी कमेंट केल्या आहेत.  

रोहितसह भारतीय संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांचा Covid 19 रिपोर्ट आला रे...

34 वर्षीय सुरेश रैनाने मागील वर्षी 15 ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रैना 2011 वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा हिस्सा होता. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या रैनाने 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  
सुरेश रैनाने मागील वर्षी युएईत रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2020 (Indian Premier League) मधून माघार घेतली होती. त्याच्या या निर्णयाने चेन्नई सुपर किंग्ज आणि संघातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. वैयक्तिक कारणाचा दाखला देत रैना युएईहून मायदेशी परतला होता.

"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"

स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचेही रैनाने अनेकवेळा सांगितले आहे. उत्तर प्रदेशच्या स्टार क्रिकेटरने 226 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात 5615 धावा केल्या आहेत. यात 5 शतकासह 36 अर्धशतकांचा समावेश आहे. रैना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. यूपी संघात त्याची वर्णी लागली असून मोठ्या विश्रांतीनंतर तो सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी (Syed Mushtaq Ali T20 trophy) स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहे.