राष्ट्रकुलमध्ये गुरुराजाने पटकाविले रौप्यपदक

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

28 वर्षीय गुरू राजा याने 249 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. गुरुराजाने क्लिन अँड जर्कमध्ये पहिल्या दोन प्रयत्नात 138 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरलेल्या गुरुराजाने तिसऱ्या प्रय़त्नात 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले असून, वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या गुरुराजाने 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. 

28 वर्षीय गुरू राजा याने 249 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. गुरुराजाने क्लिन अँड जर्कमध्ये पहिल्या दोन प्रयत्नात 138 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरलेल्या गुरुराजाने तिसऱ्या प्रय़त्नात 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद याने 261 किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकाविले. श्रीलंकेच्या चतुरंगा लकमल जयासूर्या याने 248 किलो वजन उचलून ब्राँझपदक मिळविले. 

महिला हॉकी संघाचा पराभव
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला 26 व्या स्थानावर असलेल्या वेल्स संघाकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे महिला हॉकी संघाच्या अभियानाला सुरवातीलाच धक्का बसला. 

बॅडमिंटनमध्ये श्रीलंकेचा 5-0 असा धुव्वा
भारतीय महिला बॅडमिंटन संघाने श्रीलंका संघाचा 5-0 अशा धुव्वा उडविला. आश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की या जोडीने थिलिनी प्रमोदिका हेंदाहेवा आणि काविडी सिरीमन्नागे यांचा पराभव केला.

Web Title: Weightlifter Gururaja opens Indias medal tally in Commonwealth games