वेटलिफ्टर संजीता चानू उत्तेजक चाचणीत दोषी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण यशाला गुरुवारी काळा डाग लागला. वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक विजेती संजीता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली - भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण यशाला गुरुवारी काळा डाग लागला. वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक विजेती संजीता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने स्पष्ट केले आहे. 

संजीताने ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली होती. संजीताने बंदी घालण्यात आलेले टेस्टोस्टेरॉन हे उत्तेजक घेतल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. आंतरराष्ट्रीय महासंघाने तिला तातडीने निलंबित केले असून, आता या निर्णयामुळे तिला सुवर्णपदक गमवावे लागू शकते. 

आंतरराष्ट्रीय महासंघाने संजीताचे नमुने कधी घेण्यात आले याविषयी काहीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे ती देण्यात आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर सर्व माहिती जाहीर करण्यात येईल, असे महासंघाने स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weightlifter Sanjeeeta Chanu guilty in stimulant test