esakal | वेटलिफ्टींग महासंघाचाही चीनला जबरजस्त दणका! वाचा काय निर्णय घेतला?

बोलून बातमी शोधा

वेटलिफ्टींग महासंघाचाही चीनला जबरजस्त दणका! वाचा काय निर्णय घेतला?

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने चीनमधील क्रीडा साहित्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेटलिफ्टींग महासंघाचाही चीनला जबरजस्त दणका! वाचा काय निर्णय घेतला?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ः चीनविरुद्धचा रोष वाढत आहे. आता भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने चीनमधील क्रीडा साहित्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाने गेल्या वर्षी खेळासाठीचे चार सेट मागवले होते; पण ते सदोष असल्याने त्याचा वापर यापूर्वीच बंद केला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांनीच चिनी उत्पादनांवर बंदी घालायला हवी. भारतीय वेटलिफ्टिंग महासंघ चीनमधील साहित्याचा वापर करणार नाही. आम्ही हा निर्णय क्रीडा प्राधिकरणास कळवला आहे, असे महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी सांगितले. आम्ही आता भारतात तयार झालेल्या उत्पादनांचाच वापर करणार आहोत. अगदीच वेळ पडल्यास चीनमधील कंपन्यांव्यतिरिक्त कोणत्याही देशातील कंपनी चालेल, असेही त्यांनी सांगितले. 

चीनमधील आलेल्या वेटलिफ्टिंगच्या प्लेट्‌स्‌ सदोष आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्याद्वारे सराव सुरू केला, त्या वेळी याची खात्री पटली, असे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय शर्मा यांनी सांगितले. त्यांनी खेळाडूंनी आपल्या मोबाईलमधील टिकटॉक ऍप डिलीट केले आहे. तसेच खेळाडू ऑनलाईन खरेदीच्या वेळी कंपनी चिनी नसल्याची खात्री करतात, असेही त्यांनी सांगितले. 

टेनिसमध्ये चिंता! `या` खेळाडूला कोरोना; आता जोकोविचचे काय होणार? 

चीनमधील साहित्य मागवलेच का, अशी विचारणा केल्यावर त्याच कंपनीचे साहित्य टोकियो ऑलिंपिकमध्ये वापरले जाणार असल्यामुळे आम्ही त्यास पसंती दिली होती. आम्ही प्रथमच चीनमधून साहित्य मागवले आणि ते सदोष निघाले. आता भारतीय वेटलिफ्टर्स स्वीडनमधून आयात केलेल्या साहित्याच्या मदतीने सराव करीत आहेत. जगातील अनेक स्पर्धांत हेच साहित्य वापरले जाते, असे शर्मा यांनी सांगितले.