Rahkeem Cornwall : 140 किलो वजनदार क्रिकेटपटूची दहशत; T20 मध्ये ठोकले द्विशतक - VIDEO

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज रहकीम कॉर्नवालने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास
Rahkeem Cornwall Hits Double Century In T20
Rahkeem Cornwall Hits Double Century In T20sakal

Rahkeem Cornwall Hits Double Century In T20 : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज रहकीम कॉर्नवालने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जगातील सर्वात वजनदार रहकीम कॉर्नवालने अमेरिकन टी-20 स्पर्धेत द्विशतक ठोकले आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळणाऱ्या रहकीम कॉर्नवालने अटलांटा फायर संघाकडून खेळताना स्क्वेअर ड्राइव्हविरुद्ध ही कामगिरी केली.

Rahkeem Cornwall Hits Double Century In T20
Virat Kohli : सोबत दोन स्टार पण चर्चा फक्त विराटच्या करोडोंच्या घड्याळाची

रहाकीम कॉर्नवालने 77 चेंडूत नाबाद 205 धावा केल्या. यादरम्यान त्याने 22 षटकार आणि 17 चौकार मारले. कॉर्नवॉलचा स्ट्राइक रेट 266.23 होता. 140 किलो वजन असलेल्या या क्रिकेटपटूने अलीकडेच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्फोटक खेळीने दहशत निर्माण केली होती. विजेत्या संघाला $75,000 बक्षीस रक्कम देखील देण्यात आली.

Rahkeem Cornwall Hits Double Century In T20
T20 World Cup: रोहित शर्मा अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना, 15 वर्षांचा दुष्काळ संपणार!

आपल्या भरीव शरीरामुळे वेगळी ओळख असलेल्या रहकीमने यापूर्वी अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. पण आज त्याने जे केले ते कोणत्याही विरोधी संघासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. कॉर्नवालने अलीकडेच सांगितले की, त्याची षटकार मारण्याची क्षमता नैसर्गिक आहे. तो स्वत:ला 360-डिग्रीचा खेळाडू मानतो. 6 फूट 5 इंच उंचीच्या या क्रिकेटपटूला पाहून गोलंदाजांनाच घाम फुटतो. त्याचा विश्वास आहे की, आत्मविश्वास ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

Rahkeem Cornwall Hits Double Century In T20
"भगवान राम तुमच्या..." दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या शमीला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याचे फोन

रहकीम कॉर्नवाल वेस्ट इंडिजसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याने 9 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 238 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत रहकीमने 34 विकेट्स घेतल्या आहेत. रहकीम कॉर्नवालने 76 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2695 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने 354 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com