फ्लोरिडामध्ये आज वेस्ट इंडीजचे आव्हान

West Indies Challenge in Florida Today
West Indies Challenge in Florida Today

लॉडरहिल (फ्लोरिडा) - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यावर आता भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी- २० विश्‍वकरंडक डोळ्यासमोर ठेवून तयारीला सुरवात करेल. नवी स्वप्ने, नवी आव्हाने यांचा सामनाच भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात करणार आहे. या  वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरवात उद्यापासून सुरू होणाऱ्या टी- २० क्रिकेटच्या थराराने होईल. 

विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर या मालिकेसाठी विराट कोहली विश्रांती घेणार असेच मानले जात होते. मात्र, एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत कोहलीने संaपूर्ण मालिकेत खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, मालिकेतील झटपट सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याला पूर्ण मालिकेसाठी वगळण्यात आले. अशा वेळी विश्‍वकरंडक स्पर्धेत दुर्लक्षित केलेल्या श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना आपली क्षमता दाखवून देण्याची चांगली संधी या मालिकेत मिळेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताच्या मधल्या फळीची घडी विस्कटलेली होती. त्यामुळे आता ही दरी दूर करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना आगामी सहा सामन्यांत आपले सर्वस्व पणाला लावावे लागेल. गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी, राहुल चहर असे पर्याय आहेत. 

विश्‍वकरंडक गाजविणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा शिखर धवनच्या साथीत डावाची सुरवात करेल. भारतासाठी चर्चेत असलेल्या चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुल खेळायला येईल. या संपूर्ण दौऱ्यात सर्वांत मोठी जबाबदारी रिषभ पंतवर असेल. महेंद्रसिंह धोनीची तारणहाराची भूमिका त्याला किमान झटपट क्रिकेट मालिकेत तरी निभवावी लागेल. टी- २० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजने आपले वेगळे स्थान निर्माण  केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com