INDvsWI : विराटसारखी कठोर मेहनत घ्या!; विंडीज खेळाडूंना त्यांच्याच कोचचा सल्ला

West Indies Coach urges players to play like Virat Kohli
West Indies Coach urges players to play like Virat Kohli

चेन्नई : विराट कोहली हा आदर्श आहे. तुम्हाला जर तुमची ध्येय गाठायची असतील तर भारतीय कर्णधाराप्रमाणे कठोर मेहनत घ्या, असा सल्ला वेस्ट इंडीजचे सहाय्यक प्रशिक्षक रोडी इस्टविक यांनी आपल्या खेळाडूंना दिला आहे. 

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. त्यासाठी दोन्ही संघ दाखल झालेले असून सरावही सुरु केलेला आहे. सरावानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना इस्टविक यांनी विराटची तंदुरुस्ती आणि तो घेत असलेल्या मेहनतीचे कौतूक केले. आमच्या संघातील तरुण खेळाडू खासकरून शिमरॉन हेटमेर आणि निकोलस पूरन यांनी विराट कोहलीपासून खुपकाही शिकण्यासारखे असल्याचे इस्टविक म्हणाले. 

हेटमेर, पूरन आणि होप सारख्या नवोदित खेळाडूंमुळे विंडीजचे भवितव्य उज्जव असल्याचे जाणवते. अशा काही खेळाडूंकडे प्रगती करण्याची क्षमता आहे, पण कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवायला हवी. विराट कोहलीसारखा आदर्श सर्वांच्या समोर आहे. तो तुम्हाला जिममध्ये दिसतो आणि मैदानावरही तेवढीच मेहनत घेताना दिसतो, असे सांगून इस्वविक म्हणतात, खर तर सर्वच खेळाडूंनी विराटपासून बोध घ्यायला हवा, मेहनत न घेता संधी मिळाली तर यश मिळतच राहिल याची खात्री नाही. सतत परिश्रम करणे हे कंटाळवाणे असू शकेल, पण त्यामुळे तुम्हाला यशाच्या टक्केवारीत सातत्य मिळत राहिल. तुम्हाला जर चांगल्या मेहनतीची सवय लागली तर ते नित्याचे होईल. 

भारताविरुद्धची ट्‌नेन्टी-20 मालिका गमावली असली तरी आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला केला, परंतु क्रिकेट हा खेळ गाफिल रहाण्यासारखा नाही. ट्‌वेन्टी-20 मालिकेत हेटमेरने चांगली फटकेबाजी केली. आता एकदिवसीय मालिकेत त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. आकडेवारी सर्वज जणांच्या लक्षात असते असे नाही. हेटमेरने आत्तापर्यंत चार एकदिवसीय शतके केलेली आहे. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे, मात्र त्याने सतत जागरुक रहायला हवे, असे इस्वविक यांनी सांगितले. 

सर्वोत्तम संघाबरोबर खेळल्याचा फायदा 
जेव्हा तुम्ही सर्वोत्तम संघाबरोबर खेळता तेव्हा तुमचाही दर्जा उंचावत असतो. त्यामुळे भारताविरुदध भारतात आम्हाला . खेळायला मिळते हे आम्ही भाग्य समजतो आणि जे खेळाडू प्रभाव पाडतात त्यांचा तर आत्मविश्‍वास अधिक दुणावतो, असे इस्टविक म्हणाले. टी-20 मालिकेत प्रभाव पाडणाऱ्या हेडन वॉल्श, खेरी पेरी या फिरकी गोलंदाजांचे विशेष कौतूक केले. भारतात 2023 मध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत आम्ही या फिरकी गोलदाजांना तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com