विंडीज क्रिकेट संघाच्या विश्‍वकरंडक प्रवेशात अडथळा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

सेंट ल्युसिया : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान विंडीज संघास अपयश आल्यामुळे त्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट प्रवेश करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

पावसामुळे मालिकेतील अखेरचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. विंडीजने ही मालिका जिंकली असती तरी त्यांचे मानांकन गुण कमीच झाले असते. आयसीसीच्या नियमानुसार 30 सप्टेंबरपर्यंत आयसीसी क्रमवारीतील पहिल्या नऊ संघांना थेट प्रवेश मिळतो.

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्यामुळे बांगलादेश आणि अंतिम फेरी गाठल्यामुळे पाकिस्तानने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. अर्थात, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातही कुणी पुढे जायचे यात स्पर्धा आहे.

दोघांच्या मानांकन गुणांत दोनचा फरक आहे. बांगलादेशाचे 95, तर पाकिस्तानचे 93 गुण आहेत. विंडीज संघ नवव्या स्थानावर आहे. विंडीज संघाला आता भारत आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमधून काही विजय त्यांना तारू शकतात. 

Web Title: West Indies Cricket Team obstacles to World Cup entry