वेस्ट इंडीजने रामदिनला वगळले

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जुलै 2016

बार्बाडोस - वेस्ट इंडीज क्रिकेट निवड समितीने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक दिनेश रामदिन याची उचलबांगडी केली असून, त्याच्या जागी शेन डावरिच याची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने मंगळवारी संघ जाहीर केला.

केवळ रामदिनच नाही, तर ख्रिस गेल, ड्‌वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी, जेरोमी टेलर आणि किएरॉन पोलार्ड या प्रमुख खेळाडूंनाही संघातून वगळण्याचे धाडस निवड समितीने दाखवले आहे.

वेगवान गोलंदाज जेसन होल्डरकडे नेतृत्व सोपविण्यात आले असून, मार्लन सॅम्युएल्स, कार्लोस ब्रेथवेट आणि डॅरेन ब्राव्हो या तीनच अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश आहे.

संघ - जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, देवेंद्र बिशू, जेर्मी ब्लॅकवूड, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, राजेंद्र चंद्रिका, रॉस्टन चेस, शेन डावरिच, शॅनन गॅब्रिएल, लिऑन जॉन्सन, मार्लन सॅम्युएल्स.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies dropped Ramdin