esakal | विंडीज पराभवाच्या छायेत; निम्मा संघ 15 धावांत गारद 
sakal

बोलून बातमी शोधा

West Indies Lose Five wicket

विजयासाठी भारताने ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता.

विंडीज पराभवाच्या छायेत; निम्मा संघ 15 धावांत गारद 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नॉर्थ साऊंड (अँटिगा)  - विजयासाठी भारताने ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. विजयासाठी त्यांना अजून 404 धावांची गरज आहे. त्यापूर्वी अजिंक्‍य रहाणे (102) आणि हनुमा विहारी (93) यांच्या दमदार फलंदाजीने भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 343 धावसंख्येवर घोषित करून विंडीजसमोर 419 धावांचे आव्हान ठेवले होते. 

चौथ्या दिवशी पहिल्या षटकांतच विराट कोहली बाद झाला. मात्र, याचा भारतीय फलंदाजीवर फारसा परिणाम झाला नाही. रहाणेने हनुमा विहारीच्या साथीत भारताचे आव्हान भक्कम केले. कारकिर्दीतले दहावे शतक साजरे करताना त्याने विहारीच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. रहाणेने संयमाने फलंदाजी करताना कारकिर्दीमधील दहावे शतक साजरे केले. विहारीने देखील अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर रहाणे लगेच बाद झाला. त्याने 242 चेंडूंत अवघ्या पाच चौकारांच्या सहाने 102 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर रिषभ पंतला खेळपट्टीवर टिकून रहाता आले नाही. त्याने सातच धावा केल्या. तोपर्यंत विहारी शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. मात्र, शतकासाठी सात धावांची आवश्‍यकता असताना तो बाद झाला आणि कर्णधार कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला. विहारीने 128 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक ः भारत 297 आणि 7 बाद 343 घोषित (अजिंक्‍य रहाणे 102, हनुमा विहारी 93, विराट कोहली 51, चेस 4-132) वि. वेस्ट इंडिज 222 आणि 7.3 षटकांत 5 बाद 15 (जसप्रित बुमरा 3.3-1-6-3, इशांत शर्मा 4-1-8-2)

loading image
go to top