World Cup 2019 : विंडीज फलंदाजांची पुन्हा पायावर कुऱ्हाड; संधी असूनही विकेट गमावल्या

World Cup 2019 : विंडीज फलंदाजांची पुन्हा पायावर कुऱ्हाड; संधी असूनही विकेट गमावल्या

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : एकापेक्षा एक सरस असे तडाखेबंद फलंदाज असले तरी संयमचा अभाव वेस्ट इंडीजच्या पुन्हा मुळावल आला. फलंदाजीस उपयुक्त खेळपट्टीवर चांगली धावासंख्या उभारण्याची संधी असूनही वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवण्याचा बेजबाबदारपणा दाखवला त्यामुळे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 44.4 षटकांत संपूर्ण डाव 212 धावांत संपुष्टात आला. 

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याची संधी होती त्रिशतकी धावांचा पाठलागही केला होता, परंतु भरवशाच्या फलंजाजांनी महत्वाच्या क्षणी खराब फटके मारून विकेट गमावल्या होत्या. आज इंग्लंडविरूद्ध तशीच पुनरावृत्ती झाली. ठराविक अंतराने विकेट गमावला. अपवाद निकोलस पूरमच्या 63 धावांचा ठरला. मुळचा वेस्ट इंडीयन जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवले. 

सकाळी ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळालेल्या वेस्ट इंडीजसाठी एविन लुईसचे अपयश धक्का देणारे ठरले. परिस्थिती सोपी नव्हती त्यामुळे ख्रिस गेलहीही अतिशय सावध होता, पण जम बसताच त्याने पाच चौकार एक षटकार मारला. विंडीजचा डाव स्थिरावणार असे वाटत असताना गेलला उंच फटक्‍याचा मोह आवरता आला नाही तर पुढच्या षटकांत होपच्या होप्स मार्क वूडने संपवल्या आणि अचानक 1 बाद 54 वरून 3 बाद 55 अशी अवस्था झाली. 

पूरम आणि हेटमेर यांनी 90 धावांची भागीदारी केली तेव्हा पुन्हा विंडीजची गाडी रुळावर येण्याची लक्षणे दिसू लागली, इंग्लंडचा बदली गोलंदाज ज्यो रूटने हेटमेर आणि कर्णधार जेसन होल्डरचा कमी वेगाच्या चेंडूवर चकवले, 3 बाद 144 वरून 5 बाद 156 अशी दुसऱ्यांदा घसरगुंडी झाली. 

रसेल अजूनही "आयपीएल मोड'मध्ये 
आंद्रे रसेल अजूनही "आयपीएल मोड'मध्ये असल्यासारखाच पवित्रा घेत आहे. जवपास 15 षटकांचा खेळ शिल्लक असतानाही तो प्रत्येक चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्यासाठीच बॅट चालवण्याचा मोह त्याला आवतरता आला नाही. 16 चेंडूतील त्याची 21 धावांची खेळी अल्पजिवी ठरली. 

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज ः 44.4 षटकांत सर्वबाद 212 (ख्रिस गेल 36 -41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, निकोलस पूरम 63 -78 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, हेटमेर 39 -48 चेंडू, 4 चौकार, आंद्र रसेल 21 -16 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, जोफ्रा आर्चर 9-1-30-3, मार्क वूड 6.4-0-18-3, ज्यो रूट 5-0-27-2) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com