या धावा रद्द करा; बेन स्टोक्सने केलेली विनंती

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

- जर चेंडू स्टॅंपकडे फेकला आणि तो सीमारेषेकडे गेला तर फलंदाजाने पळून धाव काढायची नाही
- तोच चेंडू जर सीमारेषेपार गेला तर धावा दिल्या जातात. 

इंग्लंड : यंदाच्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना प्रचंड वादग्रस्त झाला. या डबल टाय सामन्याचा निकाल धावांच्या नाही, विकेटच्या नाही तर चौकारांच्या संख्येवर ठरविण्यात आला. त्यामुळे यावर खूप चर्चा झाली. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ओव्हर थ्रो सिक्सची. अशातच आता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन याने एक गुपित सर्वांच्या समोर आणलं आहे. 

अंतिम सामन्यात बेन स्टोक्सच्या बॅटला लागून जेव्हा सिक्स गेला तेव्हा तो पंचांना जाऊन आम्हाला या धावा नकोत, हा सिक्स रद्द करा असे म्हणाल्याचे अॅंडरसनने स्पष्ट केले. 

''त्या चेंडूनंतर बेन स्टोक्स पंचांकडे जाऊन म्हणाला, आपण या धावा रद्द करु शकतो का? आम्हाला या धावा नकोत,'' असे अॅंडरसनने स्पष्ट केले. 

क्रिकेटच्या नियमांनुसार जर चेंडू स्टॅंपकडे फेकला आणि तो सीमारेषेकडे गेला तर फलंदाजाने पळून धाव काढायची नसते. मात्र, तोच चेंडू जर सीमारेषेपार गेला तर धावा दिल्या जातात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Is What Ben Stokes Told The Umpires After Six Overthrows