जोकोविचला अपात्र ठरवणारा 'Default' नियम आहे तरी काय?

novak
novak

वॉशिंग्टन - जगातला अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला अमेरिकन ओपनच्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. अपघाताने त्यानं मारलेला बॉल लाइन वुमनला लागल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत अशा प्रकारे ग्रँड स्लॅममधून बाहेर पडलेला जोकोविच तिसराच खेळाडू ठरला.  दरम्यान, जोकोविचला अपात्र ठरवणाऱ्या या नियमावरून पुन्हा चर्चा रंगली आहे. जोकोविचने जाणीवपूर्वक किंवा संबंधित महिलेला जखमी करण्याच्या उद्देशाने बॉल मारला नव्हता तरीही त्याच्यावर अशी कारवाई कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.

जोकोविचने घडल्या प्रकाराबद्दल संबंधित महिलेची आणि कोर्टवर रेफ्रिंसमोरही हात जोडून माफी मागितली. शेवटी नियम म्हणजे नियम असं सांगत जोकोविचला अपात्र ठरवण्यात आलं. अमेरिकन ओपन स्पर्धेतून अपात्र ठरवलं म्हणजे फक्त बाहेर पडला असं नाही तर त्यासोबत जोकोविचवर दंडात्मक कारवाईसह रँकिंगला फटका बसणार आहे.

काय घडलं कोर्टवर?
जोकोविच जेव्हा गेममध्ये मागे पडतो तेव्हा त्याला राग येतो हे नेहमीचं चित्र आहे. रविवारी झालेल्या सामन्यावेळी तो पहिल्या सेटमध्ये 5-6 ने मागे होता. तेव्हाही त्यानं रागाच्या भरातच शॉट मारला. तेव्हा तो चेंडू थेट महिलेच्या गळ्यावर लागला. अचानक आणि वेगाने लागलेल्या चेंडूमुळे महिला गोंधळली आणि खालीसुद्धा पडली. त्यावेळी जोकोविच धावतच तिच्याजवळ गेला आणि तिथेच माफीसुद्धा मागितली.

क्रीडाविषयक बातम्यांसाठी क्लिक करा sakalsports 
कोर्टवर हा प्रकार घडल्यानंतर लगेचच रेफरी सोएलरेन फेरिएमेल लगेच स्टेडियममध्ये आले. त्यांनी चेअर अंपायर ऑरेली टोर्टे आणि आंद्रेस एग्ली यांच्याशी चर्चा केली. पुन्हा त्यांनी जोकोविचशी चर्चा करून त्याला अपात्र ठरवलं. 

जोकोविच म्हणाला...
आतापर्यंत तीनवेळा अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने याप्रकरणाबद्दल सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मला यामुळे खूप दु:ख झालं आहे. मी त्या महिलेची प्रकृती कशी आहे याची माहिती घेतली. आता त्यांना ठीक वाटत आहे. जे झालं ते चुकीचं होतं आणि मला याबद्दल वाईट वाटतं. त्यांचे नाव जाहीर करू शकत नाही. आता अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर मला पुनरागमनाची तयारी करायची आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानं येणाऱ्या निराशेवर मात करायची आहे. एक खेळाडू आणि एक माणूस म्हणून या घटनेतून धडा घ्यायचा आहे.

काय आहे Default नियम?
अमेरिकन ओपनकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या नियमानुसार एखादा खेळाडू कोणत्याही अधिकारी किंवा प्रेक्षकाला जखमी करतो तर त्याला दंड केला जातो. तसंच अपात्रतेची कारवाईसुद्धा करण्यात येते. मॅच रेफरींना जोकोविच दोषी  यामध्ये दोषी आढळला. त्यानुसार स्पर्धेतील प्री क्वार्टरपर्यंत पोहोचणाऱ्या जोकोविचला मिळणारं मानधनही दिलं जाणार नाही. एवढंच नाही तर स्पर्धेत मिळालेले रँकिंग पॉइंटसुद्धा कमी करण्यात येतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com