बुमराच्या अनुपस्थितीत आफ्रिकेविरुद्ध खेळपट्ट्या कशा असणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या संघाविरुद्ध आपण कशा खेळपट्ट्या तयार करतो हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. जेष्ठ समालोचर हर्षा भोगले यांनीसुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला आहे. 

बुमराच्या अनुपस्थितीत उमेशला संधी देण्यात आली असली तरी वेगवान गोलंदाजीची भिस्त महंमद शमी आणि ईशांत शर्मावर असेल. मात्र, भारतात सामने म्हटलं की फिरकीला पोशक खेळपट्ट्या हे समीकरण पूर्वापार चालत आले आहे. त्यामुळेच आता आफ्रिकेविरुद्ध फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार केली जाणार का असा प्रश्न आहे. 

आफ्रिकेविरुद्धचा कसोची सामना हा बुमराचा भारतीय खेळपट्टीवर पहिला सामना ठरला असता. परदेशातील खेळपट्ट्यावर फलंदाजांची हवा टाईट करणारा बुमरा भारतात कशी गोलंदाजी करतो हे पाहण्यासाठी सर्वच चाहते आसुसले होते. मात्र, त्याला भारतात सामना खेळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार असे दिसते आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या गत भारत दौऱ्यात फिरकीस अनुकुल खेळपट्ट्या तयार करून पाहुण्या संघाची दाणादाण उडवली होती..आता यंदाही तसेच होणार का, याची उत्सुकता असेल.

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा वेस्ट इंडिज दौऱ्यात केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही ट्‌वेन्टी-20 सामन्यांतूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती; परंतु रविवारी बंगळूरु येथे झालेल्या सामन्यापूर्वी बुमराने संघाबरोबर सराव केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What kind of pitches will be created in the absence of Jasprit Bumrah against South Africa