esakal | काय सांगता! ऑनलाईन कॅरम स्पर्धा गुरूवारपासून सुरू होणार!

बोलून बातमी शोधा

काय सांगता! ऑनलाईन कॅरम स्पर्धा गुरूवारपासून सुरू होणार!

कोरोना आक्रमणामुळे बुद्धिबळाच्या ऑनलाईन स्पर्धा वाढल्या आहेत. आता कॅरमची ऑनलाईन चॅलेंजर स्पर्धा होणार आहे.

काय सांगता! ऑनलाईन कॅरम स्पर्धा गुरूवारपासून सुरू होणार!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना आक्रमणामुळे बुद्धिबळाच्या ऑनलाईन स्पर्धा वाढल्या आहेत. आता कॅरमची ऑनलाईन चॅलेंजर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पारंपरिक कॅरमप्रमाणे स्पर्धक एकमेकांविरुद्ध लढणार नाहीत; पण त्यांच्यात विजेतेपदासाठी नक्कीच कडवी चुरस होईल.

प्रो कबड्डीसुद्धा शक्य आहे, पण  `या` गोष्टी कराव्या लागतील

आता या आगळ्या पद्धतीने होणाऱ्या चॅलेंजमध्ये एकंदर 1 लाख 40 हजाराची बक्षिसे असतील. या स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विजेत्यास 30 हजार; तर महिला एकेरीतील विजेत्यास 20 हजाराचे बक्षीस असेल. आता या स्पर्धेवर भारतीय खेळाडूंची हुकुमत असल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियातील अव्वल खेळाडूस दहा हजाराचे खास पारितोषिक असेल. कॅरमच्या स्पर्धात ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिशद्वारे खेळाडूचे कौतुक होते. आता नेमका हाच निकष मानून स्पर्धा होत आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही चुरस असेल. पारंपरिक कॅरम लढतीप्रमाणेच स्पर्धत आठ बोर्डचे आव्हान असेल.  

कोरोना वाढतोय...कुस्तीपटूंनो जरा धीर धरा

चार दिवस होणाऱ्या या स्पर्धेत सुरुवातीस कोणीही बाद होणार नाही. मात्र चौथ्या दिवसअखेर सर्वाधिक गुण असलेले चार खेळाडू निवडले जातील आणि त्यानंतर त्यांच्यात उपांत्य आणि अंतिम लढती होतील. या चॅलेंजमधील भारतीय खेळाडूंसाठी संध्याकाळी सात ते नऊ ही वेळ आहे. युरोप, अमेरिका तसेच अन्य देशातील स्पर्धकांसाठी त्यांच्या सोयीची वेळ देण्यात आली आहे. सुहास कांबळी, मारिया इरुदीयम आणि अरुण केदार हे या चॅलेंजसाठी पंच असतील.

चॅलेंजचे स्वरूप
- स्पर्धक पारंपरिक पद्धतीने खेळण्यास सुरुवात करतील
- स्पर्धक सुरुवातीस पांढऱ्या सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर काळ्या
- ब्रेक टू फिनिश झाल्यास स्पर्धक ब्लॅक टू फिनिशचा प्रयत्न करणार
- ब्रेक टू फिनिश केल्यास पाच गुण, तर ब्लॅक टू फिनिश केल्यास तीन गुण
- ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश एकाच बोर्डवर केल्यास अल्टिमेट स्लॅमसाठी दहा गुण
- पांढरी सोंगटी चुकल्यास, काळ्या सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करायचा. याच क्रमाने सर्व सोंगट्या जाईपर्यंत खेळायचे
- पांढऱ्या तसेच काळ्या सोंगट्या एकाच प्रयत्नात न घेतल्यास, त्या पुढील प्रत्येक प्रयत्नासाठी एक दंड गुण.