World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया दिसणार भगव्या जर्सीत?

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 30 जूनला होणाऱ्या सामन्यात निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 30 जूनला होणाऱ्या सामन्यात निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे. 

भारताच्या या दुसऱ्या जर्सीबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र, अधिकृतरित्या कोणतीही जर्सी लाँच करण्यात आलेली नाही. आयसीसीसने फुटबॉलकडून प्रेरणा घेत दोन संघ एकाच रंगाच्या जर्सी घालणार नाहीत असा नियम जाहीर केला आहे.

अवे जर्सी?
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगांच्या आहेत. इंग्लंडचा संघ यजमान असल्यामुळे भारतीय संघाला वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. 

भारतीय संघाची नवीन जर्सी भगव्या रंगाची असणार असे समजते. कॉलरवर असणारा भगवा रंग संपूर्ण जर्सीत असेल तर कॉलर निळ्या रंगाची असेल. भारतीय संघाला या जर्सीबद्दल अद्याप कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Will Be Indias Jersey Against England