सरावाच्या चांगल्या सुविधा आहेत कोठे?

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी सुवर्णपदक विजेतेपदाची प्रबळ दावेदार विनेश फोगट हिने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रातही सरावाच्या चांगल्या सुविधा कुठे आहेत, अशी विचारणा केली. सरावाच्या ठिकाणी खूपच उष्णता होती, तिथे सराव केला असता तर दुखापतीची शक्‍यता होती, असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. 

नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी सुवर्णपदक विजेतेपदाची प्रबळ दावेदार विनेश फोगट हिने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रातही सरावाच्या चांगल्या सुविधा कुठे आहेत, अशी विचारणा केली. सरावाच्या ठिकाणी खूपच उष्णता होती, तिथे सराव केला असता तर दुखापतीची शक्‍यता होती, असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीगीरांना शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीत खास कार्यक्रमाचे भारतीय कुस्ती महासंघ आणि नवे पुरस्कर्ते टाटा मोटर्सने आयोजन केले होते. "आमच्याकडून ऑलिंपिक स्पर्धेत पदकाची अपेक्षा बाळगली जाते, पण एकदा सरावाच्या सुविधा बघा. भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रयत्नामुळे त्यात काही सुधारणा झाली आहे, पण त्या नक्कीच जागतिक दर्जाच्या नाहीत,' असे विनेशने सांगितले. भारतीय कुस्ती महिला संघाचे शिबिर, तसेच चाचणी लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात होते. 

कुस्ती केंद्रात अनेक सुधारणा होण्याची गरज आहे. ऑलिंपिक पदक जिंकायचे असेल तर त्या दर्जाच्या सुविधाही हव्यात. आम्ही सुविधांचा फारसा विचार न करता सराव करतो, पण त्याचा रिकव्हरीवर परिणाम होतो. लखनौच्या केंद्रातील कुस्तीचा हॉल बघितलात तर सर्वकाही लक्षात येईल. राष्ट्रीय शिबिराच्या वेळी आम्ही सर्व घामाघूम होत होतो. त्या वेळी गुडघ्यातून वेदनाही सुरू झाल्या. त्याहून वाईट म्हणजे तिथे कधी कधी वीजच नसते. त्यामुळे ट्रेनिंग सोडावे लागते. पण आम्ही त्याबाबत काहीच करू शकत नाही, असे विनेशने सांगितले. 

विनेशने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच स्पेन ग्रां. प्रि. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. विनेशने या दोन स्पर्धांतील यशामुळे आत्मविश्‍वास उंचावल्याचे सांगितले, पण त्याचवेळी आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान ऑलिंपिक इतकेच खडतर असेल, असे सांगितले.

Web Title: Where are the good facilities for practice says vinesh fogat