विराट कोहलीच्या 'गर्लफ्रेन्ड'चे नाव ...... काय?

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

ठाणे- भिवंडी येथील एका शाळेने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेत क्रिकेटपटू विराट कोहली याच्या ‘गर्लफ्रेन्ड‘चे नाव काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला आहे. संबंधित प्रश्नपत्रिका सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहे.

भिवंडी येथील चाचा नेहरू हिंदी हायस्कूललने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शारिरीक शिक्षणाच्या परिक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार केली आहे. रिकाम्या जागा भरा यामध्ये विराट कोहलीच्या ‘गर्लफ्रेन्ड‘चे नाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला असून, पर्याय म्हणून प्रियांका, अनुष्का व दीपिका असे पर्याय देण्यात आले आहेत. 

दरम्यान, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्यातील मैत्रीबाबत चर्चा सर्वत्रच आहे. संबंधित प्रश्नपत्रिकेतील प्रश्न खेळावर आधारीत असली तरी विराट कोहलीच्या ‘गर्लफ्रेन्ड‘बाबत प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणे कितपत योग्य आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. 

Web Title: Who is Virat Kohli's girlfriend? asks Maharashtra school in PT exam