BCCI ने १२ महिन्यात 6 कॅप्टन का बदलले? द्रविडने दिलं उत्तर

Rahul Dravid
Rahul Dravidesakal

गेल्या एका वर्षात बीसीसीआयने टीम इंडियाचे अर्धा डझन कर्णधार बदललेत. आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने(bcci) टीम इंडियाची(team india) घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्यावर(hardik pandya) सोपवण्यात आले. हार्दिक पांड्यासह बीसीसीआयने गेल्या एका वर्षात हा सहावा कर्णधार भारतीय टी-२० संघासाठी(t-20 team) निवडला आहे. वर्षभरात बीसीसीआयने 6 टी 20 कॅप्टन बदलल्यामुळे क्रिकेट जगतात अनेक तर्क वितर्क लावण्याच येत होते. दरम्यान, या गोष्टीवर टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडने मौन सोडलं आहे.

Rahul Dravid
युवीने 'फादर्स डे'च्या दिवशी दाखवली मुलाची पहिली झलक अन् नाव ठेवले...

आठ महिन्यांत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सहा कर्णधार असावे अशी कोणतीही योजना आखली नव्हती. परंतु यामुळे गटात आणखी 'कर्णधार' तयार करण्याची संधी मिळाली. असे मत राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

द्रविडने नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषकानंतर संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, आणि आता त्यानंतर हार्दिक पांड्या आयर्लंडमध्ये संघाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे.

द्रविडने 'स्टार स्पोर्ट्स' बोलताना यावर भाष्य केले. खरतंर हे देखील आव्हानात्मक होते, आम्ही गेल्या आठ महिन्यांत सहा कर्णधारांना मैदानात उतरवलेॉ. विशेष म्हणजे कोणतील योजना न आखता. पण हे जे घडत गेले ते आम्ही खेळत असलेल्या सामन्यांच्या संख्येमुळे आहे. कधी कधी अशी वेळ येते जेव्हा परिस्थिती स्वीकारावी लागते. अशी प्रतिक्रिया द्रविडने व्यक्त केली.

कोविड-19 मुळे मला काही लोकांसोबत काम करायला मिळाले त्याचा अनुभव चांगला होता. अनेक खेळाडूंना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्हाला गटात आणखी 'कर्णधार' तयार करण्याची संधी मिळाली. अनेक खेळाडूंना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्हाला गटात आणखी 'कर्णधार' तयार करण्याची संधी मिळाली.

दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावणे निराशाजनक होते, त्यामुळे संघ प्रत्येक बाबतीत चांगले होण्याचा प्रयत्न करत आहे. “आम्ही सतत चांगले करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत खूप प्रयत्न केले. गेल्या आठ महिन्यांतील दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने थोडा निराशाजनक ठरला आहे. अशी कबूली द्रविडने यावेळी दिली.

Rahul Dravid
टीम इंडियाला घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका नाही आली जिंकता

तसेच ,आयपीएलमुळे टीम इंडियातील गोलंदाजांचा परफॉर्मंस समोर आला आहे. त्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला आहे. आमच्याकडे व्हाईट बॉलचे चांगले क्रिकेट आहे, ते संघाचा आत्मा दर्शवते. आयपीएल दरम्यान वेगवान गोलंदाजांचा परफॉर्मंस पाहणे खूप छान वाटले, विशेषत: काही गोलंदाज अतिशय वेगाने गोलंदाजी करतात. अशा शब्दात त्याने वेगवान गोलंदाजांचे कौतुक देखील केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com