..म्हणून भारताचा ट्वेंटी20 संघ लवकर जाहीर केला गेला

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर आता OPPO च्याऐवजी BYJU'S कपंनीचे नाव येणार आहे कारण भारतीय खेळाडूंच्या जर्सीचे BYJU'S हे स्पॉनसर आहेत. त्यामुळे नवीन नावासह जर्सी तयार करण्यासाठी नाएकीला वेळ मिळावा म्हणून भारतीय संघ लवकर जाहीर करण्यात आला. 

नवी दिल्ली : पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय संघ गुरुवारी (ता.29) जाहीर  करण्यात आला. मात्र, या मालिकेसाठी भारतीय संघ चार सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार होता. संघ एक आठवडा आधीच का जाहीर करण्यात आला याचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. 

भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर आता OPPO च्याऐवजी BYJU'S कपंनीचे नाव येणार आहे कारण भारतीय खेळाडूंच्या जर्सीचे BYJU'S हे स्पॉनसर आहेत. त्यामुळे नवीन नावासह जर्सी तयार करण्यासाठी नाएकीला वेळ मिळावा म्हणून भारतीय संघ लवकर जाहीर करण्यात आला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेत तीन ट्वेंटी20 सामन्यांनंतर तीन कसोटी सामने खेळविले जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Is Why Selectors Announced Indias T20I Squad Earlier Than Scheduled