विम्बल्डन ग्रँडस्लॅम : मेरी बोझकोवा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कॅरोलिन गार्सियाला हरवले

चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोझकोवा हिने ग्रँडस्लॅमची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. बोझकोवा हिने महिला एकेरीच्या चौथ्या फेरीच्या लढतीत कॅरोलिन गार्सियाला पराभूत करीत विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला
wimbledon women 2022 Marie Bouzková defeate Caroline Garcia
wimbledon women 2022 Marie Bouzková defeate Caroline Garciasakal

लंडन : चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोझकोवा हिने (Marie Bouzková) ग्रँडस्लॅमची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. बोझकोवा हिने महिला एकेरीच्या चौथ्या फेरीच्या लढतीत कॅरोलिन गार्सियाला(Caroline Garcia) पराभूत करीत विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोझकोवा हिने गार्सियावर ७-५, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला. बोझकोवा हिने १ तास व २३ मिनिटांमध्ये या लढतीत विजय मिळवला. याआधी तिला ग्रँडस्लॅमची दुसरी फेरीही ओलांडता आली नव्हती. विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर ती म्हणाली, ‘‘मी इथपर्यंत कशी मजल मारली हे मला माहीत नाही, पण स्ट्रॉबेरी खाऊन या विजयाचा आनंद साजरा करीन.’’

ओस्तापेंकोला पराभवाचा धक्का

जर्मनीच्या तातजाना मारिया हिच्याकडून महिला एकेरीत माजी फ्रेंच ओपन विजेती येलेना ओस्तापेंको हिला पराभवाचा धक्का बसला. मारिया हिने ओस्तापेंकोचे कडवे आव्हान ५-७, ७-५, ७-५ अशा तीन सेटमध्ये परतवून लावले. पहिला सेट गमावल्यानंतर मारियाने ही लढत जिंकली हे विशेष. तिने २ तास व ८ मिनिटांमध्ये १२ व्या मानांकित ओस्तापेंकोला नमवले.

विम्बल्डनमध्ये खेळण्याची रॉजर फेडररची इच्छा

रॉजर फेडरर या महान टेनिसपटूला आणखी एकदा तरी विम्नल्डन या टेनिस स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेच्या शतकी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फेडररलाही आमंत्रण देण्यात आले होते. फेडररने ही स्पर्धा आठ वेळा जिंकली असून त्याच पार्श्वभूमीवर त्यालाही सन्मानित करण्यात आले होते. यावेळी तो म्हणाला, विम्बल्डनमध्ये पुन्हा एकदा खेळायचे आहे.

वॉटसन पराभूत

महिला एकेरीत युनायटेड किंगडमच्या हेथर वॉटसनची घोडदौड रविवारी थांबली. जर्मनीच्या ज्यूल निमिएर हिने वॉटसनवर ६-२, ६-४ अशा फरकाने विजय साकारत पुढल्या फेरीत वाटचाल केली. तिने एक तास व १७ मिनिटांमध्ये वॉटसनला पराभूत केले. वॉटसनच्या पराभवामुळे प्रेक्षकांची निराशा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com