विंडीज 311 धावांत गारद; चेसचे शतक, उमेशचे सहा बळी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजला अखेर तीनशे धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. विंडीजचा पहिला डाव आज (शनिवार) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 311 धावांत संपुष्टात आला. रॉस्टन चेसने शतक पूर्ण केले. तर, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 6 बळी मिळविण्याची कामगिरी केली. 

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजला अखेर तीनशे धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. विंडीजचा पहिला डाव आज (शनिवार) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 311 धावांत संपुष्टात आला. रॉस्टन चेसने शतक पूर्ण केले. तर, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 6 बळी मिळविण्याची कामगिरी केली. 

पहिल्या दिवसअखेर विंडिजने 7 बाद 295 धावा केल्या होत्या. आज मात्र त्यांना फार धावा जमवता आल्या नाहीत. तिसऱ्या सत्रात काहीसे प्रभावहीन ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज दिवसाच्या सुरुवातीला शानदार कमबॅक केले आणि 16 धावांमध्ये विंडीजचे 3 गडी टिपले. दुसऱ्या दिवशी विंडीजचा डाव सावरलेल्या रॉस्टर्न चेसने दुसरा दिवस सुरु होताच शतक पूर्ण केले. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक सहा बळी घेतले. 

भारताच्या तगड्या फलंदाजीसमोर आव्हान ठेवण्यासाठी दुसऱ्या दिवशी चेस आणि कर्णदार होल्डर यांनी विंडीजची खिंड लढवत 104 धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच 106 धावा करणार्या चेसचा अडथळा उमेश यादवने दूर केला. त्या पाठोपाठ देवेंद्र विशू आणि शनॉन गॅब्रिल यांनाही उमेशने बाद केले आणि विंडीजचा डाव संपुष्टात आला.

Web Title: Windies team got all out on 311