पिंपरी-चिंचवड, वेगवान पुणेचा विजय

म्हाळुंगे, बालेवाडी - मॅटवरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेत महिला विभागात झुंजार खेड संघाच्या मृणाल चव्हाणने लयभारी पिंपरी-चिंचवड संघाच्या मनुजा साळवेची केलेली सुरेख पकड.
म्हाळुंगे, बालेवाडी - मॅटवरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेत महिला विभागात झुंजार खेड संघाच्या मृणाल चव्हाणने लयभारी पिंपरी-चिंचवड संघाच्या मनुजा साळवेची केलेली सुरेख पकड.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने आयोजित मॅटवरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेत महिला विभागातून लय भारी पिंपरी-चिंचवड आणि वेगवान पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. 

महिला विभागातील पहिल्या सामन्यात लय भारी पिंपरी-चिंचवड संघाने झुंजार खेड संघावर २३-१९ असा चार गुणांनी विजय मिळविला. या लढतीत सामन्याच्या सुरवातीपासूनच लय भारी पिंपरी- चिंचवडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला; तर झुंजार खेड संघाला खरे पाहता बचाबात्मक खेळामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले. मध्यंतराला लय भारी पिंपरी-चिंचवड संघाकडे ११-८ अशी तीन गुणांची असलेली आघाडी कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या वेळी लयभारी पिंपरी-चिंचवडच्या आफरिनने अष्टपैलू खेळ करताना अकरा गुण नोदंविले. तिला  आदिती जाधवने सुरेख साथ दिली. झुंजार खेड संघाने बचाबात्मक धोरण स्वीकारत मध्यंतरापर्यंत संथ खेळ केला; तर मध्यंतरानंतर मात्र रितिका होनमाणे जोरदार आक्रमण करताना अकरा गुण मिळविले. तिला सत्यवा हळदकेरीने पाच गुण मिळवित केलेली खेळी अखेर अपुरी पडली.   

दुसऱ्या सामन्यात वेगवान पुणे या संघाने माय मुळशी संघावर २१-१७ असा चार गुणांनी विजय मिळविला. मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे १२-११ अशी एक गुणाची असलेली निसटती आघाडी विजयासाठी उपयुक्त ठरली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ १७-१७ असे बरोबरीत होते. त्यानंतर वेगवान पुणे संघाच्या दीक्षा जोरीने सुरेख पकड करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी वेगवान पुणे संघाच्या श्रद्धा चव्हाण आणि दिक्षा जोरीने सुरेख खेळ करीत प्रत्येकी सात गुण मिळविले होते. त्यांना धनश्री सणसने अचूक पकडी करत सुरेख साथ दिली. माय मुळशी संघाच्या तेजल पाटीलने सहा, तर प्रणाली आंबेकर व साक्षी गावडेने प्रत्येकी तीन गुण नोंदविताना केलेली कामगिरी अपुरी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com