Women Maharashtra Kesari : कोल्हापूर तालीम संघ; पुण्याच्या राजकारणामुळे नुकसान

सांगलीत होणारी स्पर्धा अधिकृत
Women's Maharashtra Kesari
Women's Maharashtra Kesarisakal

कोल्हापूर : सांगलीत उद्या (ता. २३) पासून सुरू होणारी महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हीच अधिकृत आहे, अशी माहिती कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील दोन गटांच्या राजकारणामुळे पैलवानांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘खासदार प्रा. संजय मंडलिक व अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तसे पत्र आले तर शहर राष्ट्रीय तालीम संघ स्पर्धेला मान्यता देईल, असे आमचे म्हणणे होते. तसे पत्र अद्याप मिळालेले नाही. सांगलीतील स्पर्धेला कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिली आहे. त्या स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून, विविध जिल्ह्यांतील महिला सांगलीत दाखल झाल्या आहेत.’’

Women's Maharashtra Kesari
Sambhaji Nagar News : जावयाने सासऱ्याची कापली दोन बोटे!

उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले म्हणाले, ‘‘भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून अस्थायी समिती स्थापन केली होती. या समितीने पुण्यात १ ते ७ एप्रिलदरम्यान महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे.

या समितीला स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही.’’ अभिनेत्री सय्यद यांनी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत शासनाचे नव्हे, तर अस्थायी समितीने स्पर्धा घेण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र दाखवले होते. अस्थायी समितीला स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Women's Maharashtra Kesari
Sambhaji nagar : गुढीपाडव्यानिमित्त ; तीनशे कोटींची उलाढाल

ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘राज्य कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याचा अधिकार आहे. गेली कित्येक वर्षे परिषद पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करते. महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान परिषदेचाच आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com