Women T20 Challenge : पूजा वस्त्राकारचा भेदक मारा; सुपरनोव्हाचा सुपर विजय| Trailblazers vs Supernovas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women T20 Challenge Trailblazers vs Supernovas 1st Match Live Cricket Score Highlights

Women T20 Challenge : पूजा वस्त्राकारचा भेदक मारा; सुपरनोव्हाचा सुपर विजय

86-8 : जेमिमाह रॉड्रिग्जची झुंज संपली

जेमिमाह रॉड्रिग्जने एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज तग धरू शतक नव्हती. अखेर मेघना सिंहने रॉड्रिग्जची 24 धावांची झुंज संपवली.

73-7 : पूजा वस्त्राकारने केली चौथी शिकार

72-6 : अरूंधती रेड्डी धावबाद 

67-4 : एलना किंग्जने ट्रेलब्लेझरला दिला चौथा धक्का 

एलना किंग्जने शर्मिन अख्तरचा शुन्यावर त्रिफळा उडवत ट्रेलब्लेझरला चौथा धक्का दिला.

65-3 : पूजा वस्त्राकारने केली तिसरी शिकार

पूजा वस्त्राकारने सोफिया डंक्लेला 1 धावेवर बाद करत आपली तिसरी शिकार केली.

63-2 : चांगली खेळणारी स्मृती बाद 

ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मानधनाने 23 चेंडूत 34 धावांची खेळी करून संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला पूजा वस्त्राकारने बाद करत मोठा धक्का दिला.

39-1 : ट्रेलब्लेझरला पहिला धक्का

पूजा वस्त्राकारने ट्रेलब्लेझरची सलामीवीर हेली मॅथ्यूजला 18 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

हरमनप्रीतची एकाकी झुंज सुपरनोव्हाज 163 धावांवर ऑल आऊट

हरमनप्रीत कौरने 37 धावांची झुंजार खेळी करत सुपरनोव्हाला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र अखेरच्या षटकात सुपरनोव्हाजच्या फलंदाजांनी कच खालला अखेर सुपरनोव्हाजचा संपूर्ण संघ 163 धावात ऑल आऊट झाला.

128-5 : सुपरनोव्हाचा निम्मा संघ माघारी

सलमा खातूनने अॅना किंग्ला 5 धावांवर बाद करत सुपरनवोव्हाची अवस्था 5 बाद 128 धावा अशी केली.

121-4 : सनी लूस 10 धावांची भर घालून परतली

सनी लूसने 10 धावांची भर घातली मात्र तिला राजेश्वरी गायकवाडने बाद करत सुपरनोव्हाला चौथ्या धक्का दिला.

100-3 : हरलीन देओलची इनिंग सलमा खातूनने संपवली

19 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या हरलीने देओलला सलमा खातूनने बाद केले.

63-2 : मॅथ्यूजने सुपरनोव्हाला दिला दुसरा धक्का

हेयले मॅथ्यूजने सुपरनोव्हाजच्या 20 चेंडूत 22 धावा करणाऱ्या प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला.

50-1 : अखेर आक्रमक डॉटिन झाली बाद

सुपरनोव्हाजला दमदार सुरूवात करून देणारी डॉटिनला रेणुका सिंहने 32 धावांवर धावबाद केले.

डॉटिन - पुनियाची दमदार सुरूवात 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुपरनोव्हाजच्या सलामीवीर डॉटिन आणि प्रिया पुनियाने दमदार सुरूवात केली. या दोघींनी पाच षटकात 50 धावांची सलामी दिली.

सुपरनोव्हाजने नाणेफेक जिंकली

हरमनप्रीत कौरच्या सुमरनोव्हाजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Women T20 Challenge Trailblazers vs Supernovas

पहिल्या सामन्याला पुण्यातील एमसीए मैदानावर सुरूवात होणार.

पुणे : Women T20 Challenge स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाजने स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझरचा 49 धावांनी पराभव केला. सुपरनोव्हाजने ठेवलेल्या 164 धावांचा पाठलाग करणाऱ्या ट्रेलब्लेझरला 20 षटकात 9 बाद 114 धावांपर्यंतच मजल मारता आली. सुपरनोव्हाजकडून पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत 12 धावात 4 बळी टिपले. तर फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीतने 37 धावांची खेळी केली. तर ट्रेलब्लेझरकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर गोलंदाजीत हेली मॅथ्यूजने 3 विकेट घेतल्या.

सुपरनोव्हाजने ठेवलेल्या 164 धावांचा पाठलाग करतानाचा ट्रेलब्लेझरने देखील चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. हेली मॅथ्यूज आणि स्मृती मानधना यांनी 39 धावांची सलामी दिली. मात्र पूजा वस्त्राकारने हेलीला 18 धावांवर बाद करत ट्रेलब्लेझरला पहिला धक्का दिला. त्यानंतर स्मृती मानधना देखील 23 चेंडूत 34 धावांची खेळी करून माघरी परतली.

स्मृती बाद झाल्यानंतर ट्रेलब्लेझरचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सुनपरनोव्हाची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडण्यास सुरुवात केली. तिने चार षटकात 12 धावा देत 4 बळी टिपले. त्यामुळे ट्रेलब्लेझरनची अवस्था 2 बाद 63 धावांवरून 7 बाद 77 अशी झाली.

दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्जने एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज तग धरू शतक नव्हती. अखेर मेघना सिंहने रॉड्रिग्जची 24 धावांची झुंज संपवली. त्यानंतर रेणुका सिंह आणि राजेश्वरी गायकवाडने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. रेणुका सिंहने 14 तर राजेश्वरीने 7 धावा करत ट्रेलब्लेझरला 20 षटकात 9 बाद 114 धावांपर्यंत पोहचवले. सुपरनोव्हाजने 49 धावांनी सामना जिंकला.

Women T20 Challenge स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोव्हाजच्या सलामीवीर प्रिया पुनिया आणि डिएन्द्रा डॉटिन यांनी पाच षटकात 50 धावांची दमदार सलीमी देत ट्रेलब्लेझरच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली.

मात्र सुपरनोव्हाजला दमदार सुरूवात करून देणारी डॉटिनला रेणुका सिंहने 32 धावांवर धावबाद केले. त्यानंतर हेयले मॅथ्यूजने सुपरनोव्हाजच्या 20 चेंडूत 22 धावा करणाऱ्या प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला. या पडझडीनंतर हर्लीन देओल आणि हरमनप्रीत कौरने सुपरनोव्हाचा डाव सावरत शतकी मजल मारून दिली.

दरम्यान, 19 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या हरलीने देओलला सलमा खातूनने बाद केले. यानंतर हरमनप्रीतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. राजेश्वरी गायकवाडने सनी लूसला 10 धावांवर, सलमा खातूनने अॅना किंग्जला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या पूजा वस्त्राकारने 14 धावांची भर घातली मात्र तिला पूनम यादवने बाद करत सुपरनोव्हाला सहावा धक्का दिला.

दरम्यान, 29 चेंडूत 37 धावांची खेळी करत संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र ती धावबाद झाली अन् सुपरनोव्हाजच्या धावगतीला ब्रेक लागला मॅथ्यूजने सोफी इकलस्टोनला 5 धावांवर बाद झाली तर मेघना सिंग देखील 2 धावा करून धावबाद झाली. अखेर मॅथ्यूजने व्ही चंदूला पायचित करत सुपरनोव्हाचा डाव 163 धावात संपवला.

Web Title: Women T20 Challenge Trailblazers Vs Supernovas 1st Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top