महिला क्रिकेट संघाला विजेतेपद

महिला क्रिकेट संघाला विजेतेपद

पॉटचेफस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका) - भारताने चौरंगी महिला क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. रविवारी अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर आठ विकेट राखून मात केली. मुंबईकर पूनम यादवची अष्टपैलू चमक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

भारताची कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजी दिली. आफ्रिकेचा डाव ४१व्या षटकात १५६ धावांत संपुष्टात आला. अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने तीन विकेट घेतल्या. लेगब्रेक गुगली गोलंदाज पूनम हिनेही तीन विकेट टिपल्या. सर्वाधिक ५५ धावा करणारी सलामीची फलंदाज सून ल्यूस हिला तिनेच बाद केले.

भारताने ३३ षटकांत हे किरकोळ आव्हान गाठले. पूनम राऊत आणि मिताली राज यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची नाबाद भागीदारी रचली. दोघींनी नाबाद अर्धशतके काढली. सामन्याची मानकरी पूनम ठरली. तिने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली.साखळीत भारताला आफ्रिकेने हरविले होते. त्यामुळे अंतिम सामना जिंकून भारताने या पराभवाची परतफेड केली.

मितालीचा उच्चांक
शैलीदार फलंदाज मिताली राज हिच्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरला. तिने १००व्या वन-डेमध्ये भारताचे नेतृत्व केले. असा उच्चांक गाठलेली ती भारताची पहिलीच कर्णधार ठरली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने केलेली कामगिरी आगामी विश्वकरंडकासाठी चांगली पूर्वतयारी ठरली. याशिवाय फलंदाज म्हणूनही मितालीने उच्चांक नोंदविला. तिने सलग सहावे अर्धशतक काढले. लिंडसे रिलर, शार्लोट एडवर्डस आणि एलीसी पेरी यांच्या पंक्तीत ती विराजमान झाली.

दीप्ती स्पर्धेची मानकरी
दीप्ती शर्मा स्पर्धेची मानकरी ठरली. तिने पाच सामन्यांतील पाच डावांत एकदा नाबाद राहत ७९.०५ रासरीसह ३१८ धावा केल्या. तिने एक शतक आणि दोन अर्धशतके काढली. 

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ः ४०.२ षटकांत सर्वबाद १५६ (सून ल्यूस ५५-७४ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, मिग्नॉन ड्यू प्रीझ ३०, चोले ट्रियॉन २०, झूलन गोस्वामी ८-२-२२-३, शिखा पांडे ६.२-१-३३-२, पूनम यादव ९-०-३२-३) पराभूत विरुद्ध भारत ः ३३ षटकांत २ बाद १६० (पूनम राऊत नाबाद ७०-९२ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, मिताली राज नाबाद ६२-७९ चेंडू, १० चौकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com