
WPL 2023 Tickets : BCCI चा 'निर्णय गतीमान' नाहीच... ऐतिहासिक पहिल्या हंगामाच्या तिकिटांचं गौडबंगाल कायम
WPL 2023 Tickets : बीसीसीआयची ऐतिहासिक अशी महिला प्रीमियर लीग सुरू होण्यास अवघे 72 तास उरले आहेत. महिला क्रिकेट वर्तुळासाठी ऐतिहासिक ठरलेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीगसाठीच्या तिकिटांची विक्री कधी सुरू होणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मात्र बीसीसीआयला तिकीटांबाबतची माहिती देण्यात अपयश आले आहे. महिला क्रिकेटबाबत बीसीसीआयचा हा कुचकामीपणा पहिल्यांदाच झालाय असं नाही.
बीसीसीआयने तिकीट विक्रीबाबतची माहिती अजून आपल्या वेबसाईटवर दिलेली नाही. महिला प्रीमियर लीगचा पहिलाच हंगाम बहुदा मोफत असावा. या लीगमधील सर्व 20 सामने मुंबईत होणार आहेत. बीसीसीआने डब्लूपीएलच्या तिकीटांची माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. डब्लूपीएल ही लहान मुले आणि मुलींसाठी मोफत असेल. बूक माय शो आणि पेटीयम हे बीसीसीआयचे तिकीट पार्टनर आहेत.
या दोन्ही पार्टनरच्या साईटवर महिला प्रीमियर लीगच्या तिकिटांबाबतची कोणतीही माहिती अजून तरी उपलब्ध झालेली नाही. बीसीसीआयने देखील डब्लूपीएल सामन्याबाबतच्या ऑफलाईन तिकीट विक्रीबाबत माहिती अजून प्रसिद्ध केलेली नाही. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचा पहिला सामना हा 4 मार्चला होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुली आणि महिलांसाठी मोफत असण्याची शक्यता आहे.
महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने हे मुंबईतील ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत. पहिल्या हंगामात गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या 5 संघांचा समावेश आहे.
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम हा जिओ सिनेमावर मोफत लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. तर याचे थेट प्रक्षेपण हे स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनलवरून होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने होईल.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...