
WPL 2023 Auction : मुंबईचे वरातीमागून घोडे; दिल्लीचा निधी शिल्लक ठेवत कोटा पूर्ण तर यूपीचे खिसा रिकामा
Women's Premier League 2023 Mega Auction : भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. जगातील सर्वात मोठ्या महिला टी 20 लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आज मेगा लिलाव झाला.
आजच्या लिलावाचे आकर्षण केंद्र ठरली ती स्मृती मानधना! रॉयल चॅलेंजर बेंंगलोरने तिला 3.4 कोटी ही सर्वोच्च बोली लावत आपल्या संघात घेतले. विशेष म्हणजे या ऐतिहासिक लिलावाची पहिलीच बोली ऐतिहासिक ठरली. भारताकडून दिप्ती शर्मा 2.6 कोटी, हरमनप्रीत कौर 1.8, पूजा वस्त्रकार 1.9 कोटी, जेमिमाह रॉड्रिग्ज 2.2 तर शफाली वर्माला 2 कोटी रूपयांची बोली लागली.
या लिलावात सर्वात स्टार खेळाडू आरसीबीने एका दणक्यात उचलले तर दिल्लीने उशिरा सुरूवात केली. मात्र स्मार्टपणे निधी शिल्लक ठेवत आपला 18 खेळाडूंचा कोटा पूर्ण केला. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आपला किमान 15 खेळाडूंचा कोटा हा शेवटच्या विशेष राऊंडमध्ये पूर्ण केला. त्यांनी संपूर्ण फंड संपवत 17 खेळाडू घेतले.
दिल्ली, गुजरात, बेंगलोरने आपला कमान 18 खेळाडूंचा कोटा पूर्ण केला. तर मुंबईने 17 आणि यूपीने 16 खेळाडूच घेतले. या दोघांनाच निधी पुरला नाही. दुसरीकडे आरसीबीचे 10 लाख तर गुजरातचे 5 लाख शिल्लक राहिले.
यूपी वॉरियर्स :
यूपी वॉरियर्सने आपले 16 खेळाडू निवडले
दिल्लीचा संघ :
दिल्लीने आपला 18 खेळाडूंचा कोटा पूर्ण केला. तसेच 35 लाख रूपये शिल्लकही ठेवले.
WPL च्या ऐतिहासिक लिलावातील टॉप लिलाव
वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या ऐतिहासिक लिलावात स्मृती मानधनाने 3.4 कोटींची बोली लागली. याचबरोबर आजच्या सर्वोत्तम 5 बोलींमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश राहिला. या यादीत दिप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जचा देखील समावेश राहिला.
यूपी वॉरियर्सची गाडी सुसाट
मुंबईचे आस्ते कदम
गुजरात जायंट्स जोरात
दिल्ली कॅपिटल्सची खरेदी
आरसीबी आतापर्यंत...
रिचा घोष RCB वासी
भारताची युवा मात्र डॅशिंग फलंदाज रिचा घोषला आरसीबीने 1.90 कोटी रूपयांना खरेदी करत आपली फायर पॉवर वाढवली.
शफाली वर्मा : दिल्ली कॅपिटल्सची दमदार खरेदी
दिल्ली कॅपिटल्सने लिलावात संथ सुरूवात केली. मात्र त्यांनी भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जला 2.2 कोटीला खरेदी करत खाते उघडले. त्यानंतर दिल्लीने शफाली वर्माला 2 कोटीला खरेदी करत मोठी प्लेअयर गळाला लावली.
मुंबई - दिल्लीत जेमिमाहसाठी चढाओढ अखेर
दिल्ली कॅपिटल्सने अखेर लिलावातील आपले पहिले खाते उघडले. त्यांनी जेमिमाह रॉड्रिग्जला 2.2 कोटी रूपयाला खरेदी केले. जेमिमाहसाठी यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स देखील इच्छुक होते.
रेणुका सिंहलाही आरसीबीने खेचले
भारताची अव्वल वेगवान गोलंदाज रेणुका सिंहला देखील आरसीबीने आपल्या गोटात खेचले. त्यांनी रेणुका सिंहसाठी 1.5 कोटी रूपये मोजले.
नॅतले सिवरसाठी मुंबईने खर्च केले 3.2 कोटी
दिप्ती शर्मासाठी यूपीने लावली मोठी बोली
भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मासाठी यूपी वॉरियर्सने 2.6 कोटींची बोली लावली.
सोफी एक्कलस्टोनसह यूपीने उघडले खाते
सोफी एक्कलस्टोनसाठी दिल्ली आणि यूपी वॉरियर्स यांच्यात स्पर्धा होती. यूपी वॉरियर्सने 1.8 कोटी ला खरेदी केले.
एलिस पेरी आरसीबीची
ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूसाठी बेंंगलोर आणि दिल्लीमध्ये रस्सीखेच झाली. आरसीबीने तिला 1.7 कोटी रूपयाला खरेदी केले.
अश्लेघ गार्डनेरसाठी गुजरातने खेळला मोठा डाव
अश्लेघ गार्डनरसाठी गुजरात जायंट्सने 3.2 कोटीला खरेदी केले.
स्मृती निसटली मात्र हरमन हाताला लागली
मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र आरसीबीने बाजी मारली होती. अखेर मुंबईला स्मृती नाही तर हरमनप्रीत कौर मात्र मिळाली. त्यांनी हरमनप्रीतवर 1.8 कोटी रूपयांची बोली लावली.
पहिलंच नाव स्मृतीचं
WPL 2023 लिलावाची सुरूवातच स्मृती मानधनाने झाली. स्मृतीचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने हात वर केला. यानंतर आरसीबीने लिलावात उडी घेत स्मृतीची बोली क्षणार्धात 2 कोटीच्या पुढे नेली अखेर आरसीबीने स्मृतीला 3.40 कोटी रूपयाला खरेदी केले.
बीसीसीआय अध्यक्षांनी दिलं भाषण
बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऐतिहासिक WPL च्या लिलावाला सुरूवात करताना ही घटना महिला क्रिकेटचे विश्व बदलून टाकणारी असल्याचे सांगितले.
दिप्ती शर्मावर लागू शकते मोठी बोली
दिप्ती शर्मा ही भारताची एक स्पिनर अष्टपैलू आहे. ती ऑफ स्पिन गोलंदाजी करते आणि डावखुरी फलंदाज आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये दिप्ती शर्माला मोठी डिमांड असू शकते. टी 20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंची चलती असते. त्यामुळे ती भारताच्या दोन स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरपेक्षाही जास्त कमाई करू शकते.
कोणाला लागू शकते मोठी लॉटरी?
कोणती विदेशी खेळाडू कोट्याधीश होऊ शकते? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
WPL 2023 Auction : या पाच विदेशी महिला क्रिकेटपटू होऊ शकतात कोट्याधीश; ऑस्ट्रेलियाचा राहणार दबदबा?
कोणत्या देशाचे किती खेळाडू?
ऑस्ट्रेलिया - 28, इंग्लंड 27, वेस्ट इंडीज 23, न्यूझीलंड 19, दक्षिण आफ्रिका 17, श्रीलंका 15, झिम्बाब्वे 11, बांगलादेश 9, आयर्लंड 6, युएई 4, अमेरिका, हाँग-काँग, नेदलँड्स आणि थायलंड प्रत्येकी 1, असोसिएट नेशन 8 खेळाडू.
किती खेळाडूंचा स्लॉट आहे?
यंदाच्या महिला प्रीमियल लीगसाठी एकूण 90 खेळाडूंचा स्लॉट आहे. यात एक संघ किमान 15 तर कमाल 18 खेळाडू घेऊ शकतात.
विदेशी खेळाडूंची संख्या : प्रत्येक संघात जास्तीजास्त 6 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा राहील. पहिल्या हंगामासाठी एकूण विदेशी खेळाडूंची संख्या ही जास्ताजास्त 30 असेल तर भारतीय खेळाडूंची संख्या 60 असेल.