WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा आजपासून रंगणार थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League 2023

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा आजपासून रंगणार थरार

Women's Premier League 2023 : अखेर भारतामध्ये महिलांच्या पहिल्यावहिल्या प्रीमियर लीगचा श्रीगणेशा होत आहे. महिलांच्या टी- २० लीगला उद्यापासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स- गुजरात जायंटस् यांच्यामध्ये सलामीची लढत रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंटस्, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व यूपी वॉरियर्स या पाच संघांमध्ये जेतेपदासाठी झुंज रंगणार आहे.

महिलांची प्रीमियर लीग ४ ते २६ मार्च या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम व नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम या दोनच ठिकाणी या स्पर्धेतील लढती होणार आहेत. २२ लढतीनंतर या स्पर्धेला जेता मिळेल. २० साखळी फेरीच्या लढतींनंतर प्ले ऑफमधील दोन लढती पार पडतील. अंतिम लढत २६ मार्च रोजी रंगेल.

दृष्टिक्षेपात

  • ४ मार्च रोजी नवी मुंबईत उद्घाटनीय लढत

  • २६ मार्च रोजी ब्रेबॉर्नमध्ये जेतेपदाचा फैसला

  • डी. वाय. पाटील व ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये लढतींचा धमाका

  • २० साखळी फेरीच्या लढती

  • दोन प्ले ऑफ लढती (इलिमिनेटर व अंतिम सामना)

आजची टी-२० लीग लढत

गुजरात जायंटस् मुंबई इंडियन्स

डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई संध्याकाळी ७.३० वाजता