...तर तुम्ही लूजर ! Womens World Cup संदर्भात अश्विनचं मोठ वक्तव्य

Indian Women Cricket Team
Indian Women Cricket TeamSakal

Womens World Cup 2022 : न्यूझीलंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेची दिमाखात सुरुवात केलीये. गुरुवारी भारतीय महिला संघ (Indian Women Cricket Team) यजमान न्यूझीलंडला भिडणार आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्निन (Ravichandran Ashwin)महिला वर्ल्ड कप स्पर्धा मोठ्या उत्साहाने फॉलो करत आहे. महिला क्रिकेटसंदर्भात त्याने मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या घडीला महिला क्रिकेटला फार महत्त्व दिले जात नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की रोमहर्षक सामन्याची मेजवाणी देण्यास महिला क्रिकेट सक्षम आहे, असे तो म्हणालाय.

Indian Women Cricket Team
Womens World Cup Points Table : पाकिस्तान तळाला; भारतीय महिला संघ कुठे?

रविचंद्रन अश्विन केवळ भारतीय संघाचे नव्हे तर इतर सामनेही पाहत आहे. आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून त्याने महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील लढतीवर बघण्याजोगी झाल्याचे सांगितले. दोन्ही संघातील सामना हा रोमहर्षक होता. जर तुम्ही महिला क्रिकेट फॉलो करत नसाल तर तुम्ही पर्वणीचे क्षण मिस करताय, असे सांगत अश्विनने महिला क्रिकेट फॉलो करण्याची विनंती क्रिकेट चाहत्यांना केलीये. जर महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीचे सामने तुम्ही पाहिले नसतील, तर तुम्ही लूजर आहात, असेही अश्विनने म्हटले आहे.

Indian Women Cricket Team
Sreesanth Retires : बंदीनंतर संधी शोधणाऱ्या श्रीसंतची निवृत्ती

भारत आणि पाकिस्तान महिला संघातील सामन्यावेळी अश्विनला मध्यफळीतील फलंदाजीची चिंता सतावत होती. मध्यफळीतील बॅटर उत्तम खेळले तर धावफलक हलवता ठेवणं सोपे जाईल. भारतीय महिला संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 300 पेक्षा अधिक धावा करण्याची कला अवगत करायला हवी, असा सल्लाही त्याने मिताली ब्रिगेडला दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com