World Badminton : साई प्रणीतला हरवून श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

श्रीकांतला या स्पर्धेमध्ये पाचवे मानांकन देण्यात आले असून
किदांबी श्रीकांत
किदांबी श्रीकांतsakal

माद्रिद : पुरुषांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत २१व्या स्थानावर असलेल्या किदांबी श्रीकांत याने भारताच्याच बी. साई. प्रणीतवर सरळ गेममध्ये मात करत माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला.

श्रीकांतला या स्पर्धेमध्ये पाचवे मानांकन देण्यात आले असून, त्याने जागतिक क्रमवारीत ४९ व्या स्थानावर असलेल्या साई प्रणीत याचा २१-१५, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. श्रीकांतने या सामन्यात लांब रॅली खेळण्यास प्राधान्य दिले. या सामन्यात एकूण ६९ रॅली खेळल्या गेल्या, त्यापैकी ४२ रॅली श्रीकांतने जिंकल्या.

किदांबी श्रीकांत
Pune Crime News : जमीन मोजणीसाठी गेलेल्या महिलेला धमकावले, गुन्हा दाखल

याआधी त्याने ३२ जणांच्या फेरीमध्ये थायलंडच्या सिथिकोम थम्मासीचा अटीतटीच्या सामन्यात २१-११, २५-२७ आणि २३-२१ असा पराभव केला होता. श्रीकांतचा पुढील सामना या माद्रिदच्या स्पर्धेमध्ये प्रथम मानांकन देण्यात आलेल्या जपानच्या केंटा निशिमोटोशी होणार आहे.

किदांबी श्रीकांत
Pune Metro : मेट्रोच्या कामामुळे शहरात आजपासून वाहतुकीत बदल

निशिमोटोला फ्रान्सच्या अर्नॉड मर्कलकडून बाय मिळाल्यामुळे त्याने उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. महिलांच्या एकेरीमध्ये दोन वेळची ऑलिंपिक विजेती भारताची पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वरदानीचा २१-१४ आणि २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com