तेव्हा "वुवुझेला' आता आले "लॉसकॉस' व्हिक्‍टरी ऑफ स्पूनचा नाद घुमवणारे नवे वाद्य 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

दक्षिण आफ्रिकेतील विश्वकरंडक फुटबॉल वुवुझेलाने गाजवली होती, तर आता रशियातील स्पर्धेत "लॉसकास' हे वाद्य स्पर्धा गाजवणार असेच दिसत आहे. लॉसकॉस याचा अर्थ आहे चमचा. त्याच्यापासून तयार झालेले हे वाद्य रशियात चांगलेच लोकप्रिय आहे. त्याने स्पर्धा स्टेडियम दुमदुमणार, असेच दिसत आहे. 

मॉस्को - दक्षिण आफ्रिकेतील विश्वकरंडक फुटबॉल वुवुझेलाने गाजवली होती, तर आता रशियातील स्पर्धेत "लॉसकास' हे वाद्य स्पर्धा गाजवणार असेच दिसत आहे. लॉसकॉस याचा अर्थ आहे चमचा. त्याच्यापासून तयार झालेले हे वाद्य रशियात चांगलेच लोकप्रिय आहे. त्याने स्पर्धा स्टेडियम दुमदुमणार, असेच दिसत आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील आठ वर्षांपूर्वीच्या स्पर्धेने प्लॅस्टिकचा तो वुवुझेला भोंगा जगभरात पोचला होता. आता रशियातील स्पर्धेद्वारे लॉसकास जगभरात पोचेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. वुवुझेलाचा दणदणाट होता, तर लॉसकॉस हे तुलनेत मंजूळ वाद्य आहे. 

रशियाने या वाद्याचा यापूर्वीच उपयोग सुरू केला आहे. स्पर्धेतील संघाचे स्वागत लोककलाकारांनी हेच वाद्य वाजवून केले होते. तीन लाकडी चमच्यांच्या मदतीने निर्माण केलेल्या संगीताने संघांचेही लक्ष वेधले होते. रशियातील नामवंत रचनाकार रुस्तम नुगामानोव यांनी त्यास जास्त आकर्षक स्वरूप दिले आणि त्यातून "स्पून ऑफ व्हिक्‍टरी' तयार झाले आणि त्यालाच स्पर्धेचे अधिकृत वाद्य म्हणून पसंती मिळाली, असे सांगितले जात आहे. 

घंटेसारखा नाद करणारे त्रेश्‍तोका, खडे अथवा आवाज करणाऱ्या वस्तू एखाद्या बंद भांड्यात टाकून ते हलवून आवाज होणारे शाकार आणि लॉसकॉस याचा विचार झाला होता; मात्र जागतिक फुटबॉल महासंघास खेळाडूंचे लक्ष विचलीत करणारे वुवुझेलासारखे वाद्य नको होते किंवा ब्राझीलमध्ये असलेले कॅक्‍सिरोलाही नको होते. कॅक्‍सिरोलाचा आवाज खूप मोठा होता आणि त्याच्यावर कोणालाही सूर धरता येत नाही, असे सांगण्यात आले. अखेर लॉसकॉसची निवड झाली. 

आता एकाचवेळी सर्वांनी लॉसकॉस वाजवण्यात घेतले, तर काय होईल, याबाबत आत्ताच कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. रशियाची लढत काही तासांवरच आली आहे. त्या वेळी नेमके उत्तर मिळेल, असेच सांगितले जात आहे. 

Web Title: World Cup 2018: Russia goes traditional, producing 'Spoons of Victory' as official noisemakers for fans