World Cup 2019 : 'हिटमॅन'ने झळकावले यंदाच्या विश्वकरंडकातील तिसरे शतक

Rohit Sharma
Rohit Sharma

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : इंग्लंडने 337 धावांचा डोंगर रचला तरी खचतील ते भारतीय फलंदाज कसले? विश्वकरंडकात पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करत असताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल शून्यावर बाद झाला. तरीही न डगमगता भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक साजरे केले. हे त्याचे विश्वकरंडकातील तिसरे शतक आहे. 

इंग्लंडने दिलेल्या 337 धावांचा पाठलाग करताना रोहितने आज 15 चौकारांसह 106 चेंडूत शतक साजरे केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 25 वे शतक आहे. त्याने 35 षटकात चौथ्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्याच्या द्विशतकाची वाट पाहणाऱ्या हजारो चाहत्यांची निराशा झाली. शतकी खेळीचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. वोक्सला जोरदार फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक बटलरकडे झेल देऊन तो बाद झाला. 

राहुल शून्यावर बाद झाल्यावर त्याने विराट कोहलीच्या साथीत 146 धावांची भागीदारी रचली. त्याच्या शतकामुळे भारताच्या पाठलागाला आता वेग आला आहे. भारताने आज सामना जिंकला तर त्यांचा उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित होईल.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com