World Cup 2019: काश्मीर नको, विराट कोहली द्या...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

मॅंचेस्टर: विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यापासून, पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी एक अजब मागणी केली असून, सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे. मात्र, छायाचित्र जुने असून, त्यामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर विराट कोहलीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असून, पाकिस्तानी चाहतेही स्तुती करताना दिसत आहेत. या शिवाय, 'फादर्स डे'च्या विनोदावरूनही पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रामध्ये काही युवक हातात पाकिस्तानी झेंडा घेऊन उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये एक बॅनर असून, आम्हाला काश्मीर नको विराट कोहली पाहिजे, असा त्यावर मजकूर आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले छायाचित्रामध्ये बदल करण्यात आला असून, ते छायाचित्र 2016 मधील आहे. मूळ छायाचित्र काश्मीरमधील दहशतवादी बुरहान वाणीचा मृत्यू झाल्यानंतर काही युवक स्वातंत्र्याची मागणी करत होते. संबंधित छायाचित्र एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. मात्र, हे छायाचित्र एडिट करून नव्याने व्हायरल होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 We Dont Want Kashmir Give Us Virat Kohli