भारताची आर्थिक ताकद हॉकी जगतास मान्य

विश्वकरंडक हॉकीचे यजमानपद पुन्बा भारतास देण्यात आले
विश्वकरंडक हॉकीचे यजमानपद पुन्बा भारतास देण्यात आले

मुंबई : भारताची जागतिक हॉकीतील आर्थिक ताकद पुन्हा एकदा दिसून आली. भुवनेश्‍वरमध्ये गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेली विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरल्याने चार वर्षांनी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपदही भारतास देण्यात आले आहे.

2023 च्या विश्‍वकरंडक पुरुष हॉकी स्पर्धा संयोजनासाठी भारतास अखेरपर्यंत दरवर्षी किमान दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेणारे मलेशिया आणि जगज्जेते बेल्जियम यांनी कडवे आव्हान दिले, पण भारताची आर्थिक ताकद अखेर सरस ठरली असे मानले जात आहे. जागतिक हॉकीचे सीईओ थिएरी वेल यांनी याचेच संकेत दिले. ते म्हणाले, हॉकीचा जागतिक प्रसार करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आर्थिक निधिची गरज असते. त्यामुळे यजमानपदाचा निर्णय घेताना स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न नक्कीच लक्षात घेतले जाते.

भारताने सुरुवातीस पुरुष तसेच महिला हॉकीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दाखवली होती. महिलांच्या स्पर्धा यजमानपदातून भारताने त्यानंतर माघार घेतली. या स्पर्धेचे यजमानपद स्पेन आणि नेदरलॅंडस्‌ला संयुक्तपणे देण्याचे ठरले आहे. ही स्पर्धा 2022 मध्ये 1 ते 17 जुलैदरम्यान होईल.

प्रथमच एका देशाला सलग यजमानपद
भारतात विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा आता चौथ्यांदा होईल. आश्‍चर्य म्हणजे 1975 च्या स्पर्धेचे यजमानपद भारतास अंतर्गत कलहामुळे गमवावे लागले होते. आता 2018 पाठोपाठ 2023 मध्ये भारतात विश्‍वकरंडक स्पर्धा होईल. याशिवाय भारतात यापूर्वी 1979 आणि 2010 मध्ये स्पर्धा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com