गिफ्टचा आनंद सुनील छेत्रीच्या टीमने 7 मिनिटात गमावला!

पहिला हाफ गोलविरहित राहिल्यानंतर अफगाणिस्तानचा गोल किपर ओवेस अझीझीच्या स्व गोलामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. पण...
India vs Afghanistan
India vs Afghanistan Twitter

FIFA World Cup 2022 Qualifiers : वर्ल्ड कप 2022 पात्रता फेरीतील भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना 1-1 असा अनिर्णित राहिला. ई ग्रुपमध्ये सुनील छेत्रीच्या भारतीय संघाने 7 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्याच्यानंतर अफगानिस्तान चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कतार आणि ओमन हे दोन संघ या ग्रुपमध्ये टॉपला राहिले. सामन्यात तीन गुण मिळवण्याची भारतीय संघाला संधी होती.

पहिला हाफ गोलविरहित राहिल्यानंतर अफगाणिस्तानचा गोल किपर ओवेस अझीझीच्या स्व गोलामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. सामन्यातील 75 व्या मिनिटाला हा गोल झाला. पण ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवण्यात भारतीय संघाला अपयश आले. 82 व्या मिनिटाला हुसेन झमानीच्या गोलच्या जोरावर अफगाणिस्तानने सामना 1-1 बरोबरीत आणला. त्यामुळे भारतीय संघाला गिफ्ट गोलमुळे मिळालेला आनंद अवघ्या 7 मिनिटात विरला. अफगाणिस्तानच्या चुकीमुळे भारतीय संघाला जिंकण्याची एक संधी निर्माण झाली होती. पण सरशेवटी ती संधी हुकली.

India vs Afghanistan
WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

जागतिक क्रमवारीत 105 क्रमांकावर असलेल्या भारतीय संघ फिफा वर्ल्ड कप 2022 पात्रता सिद्ध करण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडलाय. आशियाई चषक 2023 स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतीय संघ तिसऱ्या फेरीत खेळताना दिसेल. नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. भारतीय फुटबॉल संघाने या स्पर्धेत कर्णधार सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर बांगलादेशला 2-0 असे पराभूत केले होते. 3 जूनला 10 खेळाडूंसह खेळताना भारतीय संघाला कतारकडून 0-1 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com