लाच घेतल्याप्रकरणी फुटबॉल पंचावर कारवाई

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

रियाद (सौदी अरेबिया) - फुटबॉल सामन्यात पंच म्हणून काम करताना लाच घेतल्याच्या आरोपावरून सौदी अरेबिया फुटबॉल महासंघाने फहाद अल मिरदासी यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पंच समितीतून वगळण्याची सूचना ‘फिफा’कडेही करण्यात आली आहे. स्थानिक स्पर्धेत एका संघाला विजयी करण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणाच्या चौकशीत ते सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई केली.

Web Title: World Cup referee Fahad Al Mirdasi in Saudi Arabia investigation