T20 World Cup : पगार वाढेल या अपेक्षेनंच वर्ल्डकप जिंकायचाय!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यापूर्वीच सर्व देशांनी ऑस्ट्रेलियाचा कित्ता गिरवत महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याची सूचना केली.

ICC T20 World Cup : मेलबर्न : क्रिकेटसाठी भारत ही सर्वांत मोठी बाजारपेठ समजली जाते, पण त्यातील महिला क्रिकेटपटूंना अजून पुरेसे मानधन मिळत नाही.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विश्‍वकरंडक महिला ट्‌वेंटी 20 स्पर्धा होणाऱ्या ऑस्ट्रेलियात पुरुष तसेच महिला खेळाडूंच्या मानधनात फारशी तफावत नाही, पण भारताच्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत 10 टक्केच मानधन मिळते. आता विश्‍वकरंडक महिला ट्‌वेंटी 20 स्पर्धेत बाजी मारली; तर मानधन वाढू शकेल अशी आशा बाळगली जात आहे. 

- T20 World Cup : वर्ल्डकपचा रणसंग्राम उद्यापासून; टीम इंडियासमोर कांगारुंचे तगडे आव्हान!​

ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग कमालीची लोकप्रिय आहे; तर भारतात महिलांची क्रिकेट लीग अद्याप सुरूही झालेली नाही. मेलबर्नला महिला दिनी होणाऱ्या विशअवकरंडकाच्या महिला अंतिम लढतीस एक लाख चाहते उपस्थित असण्याची शक्‍यता आहे. हे घडल्यास ही संख्या विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या उपस्थितीपेक्षा जास्त असेल. महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चारदा ट्‌वेंटी 20 जागतिक विजेतेपद जिंकले आहे. 

- INDvsNZ : वेलिंग्टनवर बॅटिंग करायची तर...? रहाणेचा टीम इंडियाला कानमंत्र!

भारतातील परिस्थिती भिन्न आहे. शेफाली वर्माने क्रिकेट खेळता यावे म्हणून मुलांसारखे केस कापले, तसेच मुलगा असल्याचे दाखवून खेळली. पुरुषांच्या सामन्यास जोरदार प्रतिसाद लाभतो. आता चांगली कामगिरी होत असल्यामुळे वाढता पाठिंबा अपेक्षित आहे. आता या स्पर्धेत चांगली कामगिरी झाली, तर महिला क्रिकेटची लोकप्रियता नक्कीच वाढेल, असे शेफालीने सांगितले. 

- भारताला पाकमध्ये यायचं नसेल तर आशिया कपमधूनच हाकला!

Image may contain: 1 person

मानधनाचा विचारही नाही : स्मृती 

स्मृती मानधनाने भारतातील महिला आणि पुरुष क्रिकेटच्या स्पर्धेतील वादात न पडण्याचे ठरवले. भारताच्या पुरुष तसेच महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात किती तफावत आहे याचा विचारही सध्या आमच्या मनात येत नाही. सध्या आमचे लक्ष भारतासाठी सामने जिंकण्याकडे आहे. एकदा चाहते येण्यास सुरुवात झाली की उत्पन्नही वाढेल, असे स्मृतीने सांगितले. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यापूर्वीच सर्व देशांनी ऑस्ट्रेलियाचा कित्ता गिरवत महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याची सूचना केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच विजेतेपद जिंकल्यास सहा लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचे बक्षीस देण्यात येईल ही घोषणा केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup win will change our pay structure says Smriti Mandhana