‘वर्ल्ड मास्टर्स’ अँडी मरे जागतिक क्रमवारीत अव्वल

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

लंडन - ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने मोसमाच्या अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत अव्वल मानांकित नोव्हाक जोकिवच याचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपदासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

वर्ल्ड टूर मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने कॅनडाच्या मिलोस राओनिच याचे आव्हान ५-७, ७-६(७-५), ७-६(११-९) असे संपुष्टात आणले होते. 

या स्पर्धेनंतर त्याने १२.६८५ गुणांसह अव्वल स्थान भूषविले. या वर्षी त्याने विंबल्डने स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले, तर ऑलिंपिकचे सुवर्णपदकही राखले. वर्षाच्या अखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा मरे हा १७वा खेळाडू ठरला.

Web Title: 'World Masters' Andy Murray in the world rankings top