WTC Final : टॉसनंतर विराट फायनल प्लेइंग इलेव्हन ठरवणार?

भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवस अगोदरच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती, पण...
Virat Kohli
Virat KohliFile Photo

World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस पावसानेच गाजवला. दोन्ही संघातील कर्णधार पहिल्या दिवशी टॉसला आले नाही. दुसऱ्या दिवशी खेळ वेळेत सुरु होणार का? पावसामुळे खेळपट्टी रंग बदलणार का? आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार टॉसनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार पावसामुळे खेळपट्टीमध्ये बदल दिसू शकतो. या परिस्थितीनंतर भारतीय संघात काही बदलही दिसू शकतात. (WTC Final Will Virat Kohli Can-Do-Some-Change-In-Indian-Team-Playing-11-before-Toss)

भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधरन यांनीही पहिला दिवस वाया गेल्यानंतर यावर प्रतिक्रिया दिलीये. सामन्याआधी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्याची क्षमता आहे. पण टॉसनंतर पिच कंडिशननुसार, योग्य बदल केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितेल. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक सुनील गावसकर यांनीही टॉसवेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतो, असे म्हटले होते.

Virat Kohli
WTC INDvsNZ : पावसाची 'कसोटी'; पहिला दिवस पाण्यात!

एका मुलाखतीमध्ये गावसकर म्हणाले होते की, टीम इंडिया अतिरिक्त स्पिनरच्या जागी फलंदाजी भक्कम करण्याबाबत विचार करु शकतो, असे गावसकर यांनी म्हटले होते. ICC च्या नियमावलीनुसार, एक दिवस अगोदर प्लेइंग इलेव्हनच्या घोषणेप्रमाणे टीम खेळवण्याचे कोणतेही बंधन नाही. ज्यावेळी टॉस केला जातो त्यावेळी कर्णधाराला प्लेइंग इलेव्हन सांगावी लागते.

Virat Kohli
शफालीचा तोरा आणि पावसाच्या धाराच टीम इंडियाला वाचवू शकतील

गावसकर म्हणाले होते की, भारतीय संघाने एक दिवस अगोदर प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असली तरी टॉसवेळी यात बदल केला जाऊ शकतो. जोपर्यंत टॉसला येणारे कॅप्टन प्लेइंग इलेव्हनची शीट एकमेकांना शेअर करत नाहीत तोपर्यंत फायनल टीम कोणती ते सांगता येत नाही, असे गावसकरांनी म्हटले होते. सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रविंद्र जडेजा आणि अश्विनच्या रुपात दोन स्पिनर्सला टीममध्ये स्थान दिले आहे. पावसानंतर खेळपट्टीचा विचार करुन भारतीय संघाचा कर्णधार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघाने एक दिवस अगोदर प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना तीन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान दिले. यात अनुभवी ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांचा समावेश होता. स्थानिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढच्या काही दिवसांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com