WPL 2023: थरारक सामना! दिल्लीला शेवटच्या 13 चेंडूत 13 धावांची गरज अन् गुजरातचा दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 Gujarat Giants beats Delhi Capitals

WPL 2023: थरारक सामना! दिल्लीला शेवटच्या 13 चेंडूत 13 धावांची गरज अन् गुजरातचा दणदणीत विजय

WPL 2023 Gujarat Giants beats Delhi Capitals : महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा 11 धावांनी धुवा उडवला. गुजरात जायंट्सने सहा सामन्यांनंतर दुसरा विजय नोंदवत पॉइंट टेबल मध्ये स्थिती सुधारली आहे. लिलावादरम्यान सर्वाधिक रक्कम मिळालेली विदेशी खेळाडू अॅशले गार्डनने गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अॅश्लेने 33 चेंडूत 51 धावांची स्फोटक खेळी खेळली. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. गुजरातकडून दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डने 45 चेंडूत 57 धावा केल्या.

या विजयासह गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दोन विजय आणि चार पराभवांसह सहा सामन्यांतून चार गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यास मुकला आहे. त्याला फक्त एका विजयाची गरज आहे. सहा सामन्यांत चार विजय आणि दोन पराभव आणि आठ गुणांसह दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

दिल्लीच्या संघाला 13 चेंडूत 13 धावा आल्या नाहीत करता

एकवेळ दिल्लीच्या आठ विकेट्सवर 135 धावा झाल्या होत्या. त्यांना13 चेंडूत 13 धावांची गरज होती. अरुंधती रेड्डी आणि शिखा पांडे क्रीजवर होत्या आणि दोघांमध्ये 35 धावांची भागीदारी झाली.

यानंतर किम गर्थने अरुंधती रेड्डीला बाद करत सामना उलटवला. रेड्डी 17 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा करून बाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात गार्डनरने पूनम यादवला (0) बाद करत गुजरातला विजय मिळवून दिला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या. एल वोल्वार्डने 57 आणि ऍशले गार्डनरने नाबाद 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 18.4 षटकांत सर्वबाद 136 धावांवर आटोपला. दिल्ली संघाला केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू आला. गुजराततर्फे किम गर्थ, तनुजा कंवर आणि गार्डनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी कर्णधार स्नेह राणा आणि हरलीन देओलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.