
WPL 2023 VIDEO: नशीबवान हरमनप्रीत कौर! चेंडू विकेटला लागला तरी झाली नाही आऊट
WPL 2023 MI vs UP Harmanpreet Kaur : महिला प्रीमियर लीग 2023 चा 10 वा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. सामन्यादरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीदरम्यान चेंडू स्टंपला लागल्याने एक विचित्र घटना पाहण्यात आली, परंतु नशीबवान असलेली हरमनप्रीत नाबाद राहिली.
हरमनप्रीत कौर फलंदाजी करत असताना अंजलीचा चेंडू स्टंपला लागला, पण हरमनला बेल्स न पडल्यामुळे ती बाद झाली नाही आणि शेवटी तीही यूपीच्या पराभवाचे कारण ठरली.
ही घटना मुंबईच्या डावातील 11व्या षटकात घडली. अंजलीने तिसऱ्या चेंडू टाकला आणि तो थेट स्टंपवर गेला. गुजरात जायंट्सची कर्णधार आणि यष्टिरक्षक अॅलिसा हिलीने लगेचच ही विकेट साजरी करण्यास सुरुवात केली, पण दुसऱ्याच क्षणी तिने विकेटकडे पाहिले तेव्हा बेल्स खाली पडले नव्हते.
क्रिकेटच्या नियमांनुसार, बेल्स खाली येईपर्यंत फलंदाजाला बाद घोषित करता येत नाही. हरमनप्रीत कौरचे असे नशीब पाहून यूपी वॉरियर्सचे सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले.
ही घटना घडली तेव्हा मुंबईचा कर्णधार 11 चेंडूत 7 धावा करून खेळत होती. हरमन बाद झाली असती तर कदाचित यूपी येथून मुंबईवर दडपण आणू शकले असते, परंतु या भारतीय फलंदाजाने या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला आणि 33 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 53 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीसाठी हरमनप्रीत कौरला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.