Smriti Mandhana : स्मृती नुसतीच आरंभशूर! दमदार सुरूवातीनंतर स्टार मानधनाने कच खाल्ली | WPL 2023 MIW vs RCBW | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana RCB

Smriti Mandhana : स्मृती नुसतीच आरंभशूर! दमदार सुरूवातीनंतर स्टार मानधनाने कच खाल्ली

Smriti Mandhana WPL RCB : आरसीबीची कर्णधार... Women's Premier League च्या ऐतिहासिक पहिल्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू... WPL मधील सर्वात तगड्या संघाची कर्णधार असलेली स्मृती मानधना मुंबई इंडियन्सच्या सामन्यात आरंभशूर निघाली. तिने 17 चेंडूत तडाखेबाज 23 धावा केल्या. मात्र डोळ्यासमोर दोन विकेट्स पडल्या असताना देखील ती आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाली.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधनाने आक्रमक फटकेबाजी करत पहिल्या चार षटकात 35 धावांपर्यंत मजल मारून दिली. तिला दुसऱ्या बाजूने सोफी डिवाईन चांगली साथ देत होती. आता वाटले की आरसीबी आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार.

मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या दोन षटकात हे सगळं चित्र पाटलं. डावखुरी फिरकी गोलंदाज सैकी इशाकने पाचव्या षटकात 16 धावांवर डिवाईनला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात दिशा कसातला शुन्यावर बाद करत दुसरा धक्का दिला.

दोन धक्क्यानंतर डाव सावरण्यासाठी हेथर नाईट क्रीजवर आली होती. दुसरीकडे स्मृती मानधनाने 17 चेंडूत 23 धावा करत चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र सहाव्या षटकात हेली मॅथ्यूजने आरसीबीला पुन्हा दोन धक्के दिले. तिने आक्रमक फटकेबाजीच्या नादात असलेल्या स्मृतीला झेलबाद केले. त्यानंतर हेथर नाईटचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....