WPL 2023 DCW vs UPW : 11 चौकार 4 षटकार! मॅग्राथ झुंजली, मात्र दिल्लीचा दुसरा दमदार विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 DCW vs UPW

WPL 2023 DCW vs UPW : 11 चौकार 4 षटकार! मॅग्राथ झुंजली, मात्र दिल्लीचा दुसरा दमदार विजय

WPL 2023 DCW vs UPW : दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय साजरा केला. दिल्लीकडून मेग लेनिंगने धडाकेबाज 70 धावांची खेळी केली. यानंतर जेस जोनासेनने 20 चेंडूत नाबाद 41 धावा करत दिल्लीला 211 धावांपर्यंत पोहचवले. मात्र यूपी वॉरियर्सला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 169 धावांपर्यंतच मजल मारता आली. यूपीकडून ताहलिया मॅग्राथने 90 धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून तिला साथ मिळाली नाही.

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेस जोनासेनने एकाच षटकात 24 धावा करणारी एलिसा हेली आणि किरण नवगिरेला (2) बाद करत दोन धक्के दिले. यानंतर श्वेता शेरावतला मारिझाने काप्पने 1 धावेवर बाद करत यूपीची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली.

यानंतर दिप्ती शर्मा आणि तालिहा मॅग्राथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी अनुभवी शिखा पांडेने फोडली. तिने दिप्तीला 12 धावांवर बाद केले. दिप्ती बाद झाल्यानंतर मॅग्राथने देविका वैद्यसोबत भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. दरम्यान, मॅग्राथ देखील आपल्या अर्धशतकाजवळ पोहचली होती. तिने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

मात्र धावगती मंदावल्यामुळे यूपी वॉरियर्ससाठी आव्हान आवाक्याबाहेर गेले. सामना 17 चेंडूत 88 धावा असा आला होता. मॅग्राथने फटकेबाजी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. मात्र मॅग्राथची ५० चेंडूत केलेली 90 धावांची खेळी सामना जिंकून देता आला नाही.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 211 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून सलामीवीर मेग लेनिंगने 70 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर जेस जोनासेनने 20 षटकात नाबाद 42 तर जेमिमाहने 22 चेंडूत नाबाद 34 धावा करत तिला चांगली साथ दिली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी रचत संघाला 211 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर