WPL Auction 2023 : या 15 वर्षाच्या मुली देखील लिलावात दाखवतील आपला दम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL Auction 2023 Youngest

WPL Auction 2023 : या 15 वर्षाच्या मुली देखील लिलावात दाखवतील आपला दम

WPL Auction 2023 Youngest : भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील पहिला वुमन प्रीमियर लीग (Women's Premier League) लिलाव आज होत आहे. या लिलावात जगभरातील 449 खेळाडू आपले नशीब आजमावून पाहणार आहेत. यातील 270 खेळाडू हे भारतीय आहेत.

या लिलावात भारतीय महिला संघातील खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेलच मात्र त्यात बरोबर काही युवा खेळाडूंही आकर्षणाचा विषय ठरणार आहे. यातील काही खेळाडूंनी नुकतेच भारताला पहिला 19 वर्षाखालील महिला टी 20 वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

आजच्या लिलावात 15 वर्षाच्या तीन खेळाडू लिलावातील युवा खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतात. यातील पहिली आहे वेगवान गोलंदाज शबनम एमडी, तर दुसरी आहे डावखुरी फिरकीपटू सोनम यादव! या दोघीही 19 वर्षाखालील विश्वविजेत्या भारतीय संघातील सदस्या आहेत.

याचबरोबर आंध्रप्रदेशची डावखुरी फिरकीपटू विनी सुझान देखील आपली दावेदारी सादर करणार आहे. या सर्व युवा खेळाडूंची बेस प्राईस ही 10 लाख रूपये इतकी आहे.

ऐतिहासिक वुमन्स प्रीमियर लीग लिलाव मुंबईच्या जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटर येथे होणार आहे. या लिलावात महिला प्रीमियर लीगमधील 5 फ्रेंचायजींना एका संघाचे स्वरूप येणार आहे.

महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या हंगामात खेळण्याची संधी मिळावी यासाठी जगभरताली जवळपास 449 महिला क्रिकेटपटूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. आता पाच फेंचायजी यातून आपली संघ बांधणी करतील. प्रत्येक संघाला लिलावात 12 कोटी रूपये खर्च करण्याची मुभा असेल. या लिलावात 90 स्पॉट्स भरले जाणार असून यातील 60 खेळाडू भारतीय असतील तर 30 खेळाडू हे विदेशी असतील.

(Sports Latest News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस