DC vs MI WPL Final: दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचणार? मुंबईशी आज अजिंक्यपदाची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wpl final 2023 delhi capitals-women-vs-mumbai-indians-women dc vs mi final playing xi cricket news in marathi

DC vs MI WPL Final: दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचणार? मुंबईशी आज अजिंक्यपदाची लढत

WPL Final 2023 Delhi Capitals vs Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा शेवट आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स- दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये अजिंक्यपदाची लढत रंगेल.

मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म चिंतेचा विषय असला तरी नॅट सिव्हर क्रंट हिच्या दमदार फॉर्ममुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या मेग लॅनिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने या वर्षी सहाव्यांदा टी-२० विश्वकरंडक पटकावला. आता तिला महिला प्रीमियर लीगच्या जेतेपदावर मोहोर उमटवण्याचा ध्यास लागला आहे.

मुंबईच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत हिने या लीगमधील पहिल्या पाचपैकी तीन लढतींमध्ये शानदार अर्धशतक झळकावले आणि संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. पण त्यानंतरच्या

चार लढतींमध्ये तिला फक्त २५, २३, २, १४ अशाच धावा करता आल्या आहेत. मुंबईसाठी आजच्या लढतीत तिचे फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सिव्हर हिने या स्पर्धेमध्ये आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करताना फलंदाजीत २ अर्धशतकांसह २७२ धावा आणि १० विकेट टिपण्याची किमया करून दाखवली आहे.

सर्वोत्तम पाचपैकी चार गोलंदाज हे मुंबई संघाचे आहेत हे दिसून येईल. साईका इशाक (१५ विकेट), अमेलिया केर (१३ विकेट), हेली मॅथ्यूज (१३ विकेट) व इसाबेल वाँग (१२ विकेट) या मुंबईच्या गोलंदाजांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे. सोफी एक्लेस्टोन पहिल्या स्थानी विराजमान आहे.

आजची अंतिम लढत मुंबई - दिल्ली, ब्रेबॉर्न रात्री ७.३० वाजता