कुस्तीपटू बजरंग पुनियाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर 

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

भारताचा स्टार कुस्तीपटू बंजरंग पुनियाला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू बंजरंग पुनियाला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. 

भारतीय कुस्ती महासंघातर्फे कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. बजरंग पुनिया सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने नुकतेच चीनमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपदाचे विजेतेपद पटकाविले आहे. 

त्याने गेल्या वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले होते. त्यापूर्वी त्याने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकाविले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrestler Bajrang Punia to be awarded Rajiv Gandhi Khel Ratna Award