Bajrang Punia Wrestler Protest : आयुष्य पणाला लागलंय नोकरीचं काय... अफवांचा बाजार गरम असताना बजरंगचे ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajrang Punia Wrestler Protest

Bajrang Punia Wrestler Protest : आयुष्य पणाला लागलंय नोकरीचं काय... अफवांचा बाजार गरम असताना बजरंगचे ट्विट

Bajrang Punia Wrestler Protest : आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी अमित शहांची शनिवारी रात्री भेट घेतली. त्यानंतर सर्व आंदोलक कुस्तीपटू हे सरकारी सेवेत रूजू झाले. ही बातमी आल्या आल्या सगळीकडे कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आंदोलनातील कुस्तीपटूंनी जरी त्यांनी सरकारी सेवेत पुन्हा रूजू होण्याचा निर्णय घेतला असला तरी आंदोलन सुरूच राहणार असे सांगितले. साक्षी मलिकने पहिल्यांदा ट्विट करत याबाबत खुलासा केला. आता बजरंग पुनियाने देखील ट्विट केले आहे.

बजरंग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'आमच्या पदकांची 15 रूपये किंमत करणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहे. आमचं आयुष्यच पणाला लागलं आहे. त्याच्यापुढे ही नोकरी फार छोटी गोष्ट आहे. जर नोकरी न्यायासाठी अडसर ठरत असेल तर त्या नोकरीचा त्याग करण्यासाठी एक सेकंद देखील वेळ लागणार नाही. नोकरीची भिती दाखवू नका.'

यापूर्वी साक्षी मलिकने देखील तिने आंदोलनातून माघार घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ट्विट केले होते. ती आपल्या ट्वीट मध्ये म्हणाली की, 'ही चुकीची बातमी आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही माघार घेतलेली नाही. ना माघार घेणार आहे. सत्याग्रहासह रेल्वेमधील आपली जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच आहे. कृपा करून कोणताही चुकीची बातमी चालवू नका.'

या ट्विटनंतर साक्षी मलिकने देखील बजरंग पुनियासारखेच ट्विट केले.

पदकविजेत्या कुस्तीपटूंनी 18 जानेवारीला पहिल्यांदा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर 23 एप्रिलला दुसऱ्यांदा आंदोलन केले. या आंदोलनावेळी कुस्तीपटूंची आणि पोलिसांची झटापट देखील झाली. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पोलिसांनी बळाचा वापार करत कुस्तीपटूंना जंतर मंतरवरून हलवले. यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले.

(Sports Latest News)